ट्रॅव्हल्स व कंटेनरचा भीषण अपघात; एक जण जागीच ठार चार जखमी

Photo of author

By Sandhya

ट्रॅव्हल्स व कंटेनरचा भीषण अपघात

शिरवळ हद्दीतील ट्यूब कंपनी जवळ ट्रॅव्हल्स व कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात सूरज शेवाळे (वय 27), रा. टाळगाव शेवाळवाडी हा जागीच ठार झाला. अन्य चारजण जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कंटेनर NL 01 G 4069 व ट्रॅव्हल्‍स MH 01 DR 0108 या दोन्ही गाड्या पुण्यावरून कोल्हापूरला निघाल्या होत्या. पहाटे सव्वाचारच्या सुमारास शिरवळ हद्दीत ट्यूब कंपनीजवळ हायवेवर कंटेनर पुढे जात असताना मागून येणाऱ्या ट्रॅव्हल्सने ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाला.

मागील बाजूस असलेल्या ट्रॅव्हल्सने दिलेली ही धडक एवढी जोरात होती की, ट्रॅव्हल्सच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या धडकेत पुढील बाजूस बसलेल्या सुरज याचा जागीच मृत्यू झाला.

तर राजश्री मोरे (वय 29) रा. कराड, शंकर बागडे (वय 45) रा. शिराळा, अमित पवार (वय 29) रा. किंद्रेवाडी, अंकुश पाटील (वय 44) रा. ऐनुबारे सांगली हे चारजण किरकोळ जखमी झाले आहेत.

या प्रकरणी ट्रॅव्हल्स चालक प्रशांत सोनवणे (वय 35) रा. अंबरनाथ याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नवनाथ मदने करीत आहेत.

Leave a Comment