
धाराशिव : तुळजाभवानी मंदिरात विविध सेवा पुरवण्यासाठी मंदिर संस्थांनच्या मालकीची हजारो एकर जमिन निजाम सरकारने मठाला दिली होती. या मठाच्या ताब्यात असलेल्या जमिनीवर सोलार प्रकल्प उभारण्याचा निर्णय मंदिर संस्थांकडून घेण्यात आला आहे. मात्र या सोलार प्रकल्पातून येणाऱ्या अर्थिक उत्पन्नाचा निम्मा हिस्सा मठाला देण्यास भोपे पुजारी मंडळाकडून विरोध करण्यात येत आहे. यामुळे मठाच्या जमिनीसाठी तुळजाभवानी मंदिर संस्थान आणि पुजारी यांच्यात वाद पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.
तुळजाभवानी मंदिरात विविध सेवा देण्यासाठी निजाम सरकारने मठाला हजारो एकर जमीन दिली आहे. तर तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जमिनीवर १३५० कोटींच्या गुंतवणुकीतून ३०० मेगावॅटचा सोलार प्रकल्प उभारला जाणार आहे. या बाबत मंदिर संस्थानकडून बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात वेगवेगळ्या सेवा पुरवणाऱ्या मठाच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या अनुषंगाने मंदिर संस्थानच्या जमिनीवर हा सोलार प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
मंदिर संस्थानच्या मालकीची आणि मठांच्या ताब्यात असलेली ही १५०० एकर जमीन सोलार प्रकल्प उभारण्यासाठी भाड्याने देण्यात येणार आहे. मात्र यामधून येणाऱ्या आर्थिक उत्पन्नाचा अर्धा हिस्सा मठाला देण्यास पुजारी मंडळाकडून विरोध करण्यात आलाय. त्यामुळे मठाच्या जमिनीसाठी वाद पेटण्याची चिन्ह दिसत आहेत.
दरम्यान तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जमिनीची परस्पर विलेवाट लावत असल्याचा आरोप भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी केला आहे. तसेच मंदिर संस्थांनने यासंदर्भात मनमानी कारभार केला; तर आम्ही उच्च न्यायालयात जाऊ असा इशाराही पुजारी मंडळाकडून देण्यात आला आहे. यामुळे मंदिर संस्थान आणि पुजारी यांच्यात वाद पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहे