उदय सामंत : कालचा शो पूर्ण फ्लॉप! शिवाजी पार्क राहुल गांधींसाठी नाही तर बाळासाहेबांच्या विचारांसाठी

Photo of author

By Sandhya

उदय सामंत

“शिवाजी पार्कमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या सभा असायच्या. काल शिवाजी पार्कमध्ये गर्दी नव्हती. कालचा शो पूर्ण फ्लॉप होता. महाराष्ट्राने ठरवलंय, इथून एनडीएचे ४५ हून अधिक खासदार येतील.”

असे शिवाजी पार्कवर काल झालेल्या इंडिया आघाडीच्या मेळाव्यावर प्रतिक्रिया देताना उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले. एका वृत्तसंस्थेशी ते बोलत होते. शिवाजी पार्कवर भारत जोडो न्याय यात्रा दादर येथील शिवाजी पार्कवर भारत जोडो न्याय यात्रेची राहुल गांधी यांची सभा झाली.

याबद्दल मंत्री उदय सामंत म्हणाले, शिवाजी पार्क हे ठिकाण बाळासाहेबांच्या ज्वलंत विचारांसाठी आहे. राहुल गांधींसाठी नाही. राहुल गांधी यांनी या सभेतून काय साधले? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सगळे पक्ष एकत्र आले. तरीदेखील एखा सभेसाठी गर्दी दिसली नाही.

उदय सामंत म्हणाले… शिवाजी पार्क बाळासाहेबांच्या ज्वलंत विचारांसाठी, सभा त्यांच्या विचारांमुळे गाजायची. माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो” हे वाक्य ऐकताच एकाचवेळी लाखो लोक प्रतिसाद द्यायचे. पण आता खूप मोठे बदल झालेले दिसलेत.

राहुल गांधीच्या भाषणात बाळासाहेबांचा उल्लेख नाही. काल झालेल्या सभेवरून हे सिद्ध झाले आहे की, शिवाजी पार्क हे राहुल गांधींसाठी नाही तर फक्त बाळासाहेबांच्या ज्वलंत विचारांसाठी आहे. कितीही अपशकुन करा एनडीए महाराष्ट्रात ४५ पार आणि I.N.D.I.A देशातून हद्दपार होणार.

Leave a Comment