उदयनराजे भोसले : शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस साडेतीन जिल्ह्यांपुरती…

Photo of author

By Sandhya

उदयनराजे भोसले

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष आहे. त्या पक्षापेक्षा त्याच्या नेत्यांनी साताऱ्यात चार काय चाळीस सभा घेतल्या तरी मला फरक पडत नाही, असे महायुतीचे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची कुठेही बरोबरी होऊ शकत नाही. कारण नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत आणि केंद्राच्या सर्व सत्ता त्यांच्या हातात आहेत. शरद पवार हे राज्यातल्या साडेतीन जिल्ह्याचे नेतृत्व करतात.

ते स्वप्न नगरीचे पंतप्रधान आहेत. ज्यांनी पद्मविभूषण पुरस्कार घेतला. ते स्वतःला मानसपुत्र समजतात. त्या शरद पवारांना यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न मिळायला हवा ते कधी वाटले नाही. असा प्रयत्न त्यांनी का नाही केला असा प्रश्न उदयनराजेंनी उपस्थित केला.

साताऱ्यातील जनता माझ्यासोबत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला मोठ्या संख्येने साताऱ्यातील नागरिक उपस्थित होते. शरद पवार यांच्याकडे व त्यांच्या पक्षाकडे कोणतेही काम नाही. असताना काही करायचे नाही आणि सत्ता गेल्यावर गोंधळ घालायचा असा प्रकार त्यांचा सुरू आहे.

पवारांचा हा पक्ष विदर्भ मराठवाडा आणि इतर कुठेच नाही अशी टीका करत उदयनराजे म्हणाले, त्यांनी साताऱ्यामध्ये चार नाही तर चाळीस सभा घ्याव्यात. आम्हाला काही फरक पडत नाही. त्यांना जास्त सभा घ्याव्यात असे वाटत असेल तर आम्ही त्यांच्या सभेचे सर्व नियोजन करतो, तयारी करून देतो असेही उदयनराजे म्हणाले.

सातारा मतदारसंघात चार विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. साताऱ्यामध्ये यावेळी कोणत्याही परिस्थितीत मतांचे विभाजन होणार नाही. आणि माझा विजय होईल असे त्यांनी सांगितले

Leave a Comment