विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना(उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात राजन तेली यांच्या प्रचारार्थ सभा घेतली.
यावेळी त्यांनी शिंदेसेनेवर जोरदार टीका केली. तसेच, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मोठा दावा केला. ठाकरे म्हणाले की, “माझे सरकार पाडले नसते, तर णी शेतकऱ्याना कधीच कर्जमाफी दिली असती.”
शिवरायांचा पुतळा पडल्यावरुन मुख्यमंत्री शिंदेंवर टीकाउद्धव ठाकरे यांनी यावेळी सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावरुन उद्धव ठाकरे यांनी दीपक केसरकर यांच्यावर जोरदार टीका केली. शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे पडल्याचा ठपका ठेवणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे.
आपले इथले आमदार खाली मुंडी पाताळ धुंडी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर ते म्हणतात की, वाईटातून काहीतरी चांगलं होतं. महाराजांचा पुतळा पडला त्यातून चांगलं काय होणार आहे. तुमच्या डोक्यामध्ये मेंदू आहे की, कचरा? त्यातून काही चांगलं होणार नाही, पण दीपक केसरकर पडल्यानंतर सिंधुदुर्गाचे चांगले होणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
…तर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असती मी ज्या काही गोष्टी आणू इच्छित होतो, त्या अजूनही का झाल्या नाहीत याचे उत्तर द्या. मल्टी स्पेशल हॉस्पिटलसाठी मी परवानगी दिली होती, पैसे देत होतो, पण ते अजूनही झाला आहे का? आपले सरकार आल्यानंतर मी तुम्हाला चांगले हॉस्पिटल देणार.
मी 2019 मध्ये मुख्यमंत्री झालो, तेव्हा सर्वप्रथम रायगड किल्ल्याच्या नूतनीकरणासाठी आणि शेतकरी कर्जमाफीसाठी निधी देण्याचे ठरवले होते. पण, माझे सरकार पाडले नसते, तर मी कधीच शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले असते, असा दावा त्यांनी केला.