70 हजार कोटींचा उपमुख्यमंत्री मग, मुख्यमंत्री कितीचा असेल, असा सवाल ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. चोराच्या हातात धनुष्यबाण दिले आहे पण, मशाल बघा कशी पेटलेली आहे.
राजकारणात भाजपला पोरंच होत नाहीत. म्हणून त्यांना नकली संतान, आपल्याकडचे गद्दार मांडीवर घ्यावे लागले आहेत, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या सभेत केले.
नाशिकमध्ये बुधवारी राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची भव्य सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरेंनी मोदींसह शिंदे-फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करत उद्धव ठाकरे म्हणाले की, हिंदुह्रदयसम्राट शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी स्वत: शिवसेनेची जबाबदारी माझ्यावर सोपवली. तरी देखील काही पावटे, आपल्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणतात.
आपल्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणणारे पावटे, या पावट्यांना कुठे मोड फुटले आहेत, माहित नाही. अहो, आता तर यांची इथपर्यंत मजल गेली की, हिंदुह्रदयसम्राटांचा मी पुत्र आणि तेलंगणाच्या भाषणामध्ये ते मला नकली संतान म्हणाले.
मोदीजी, मी तुम्हाला माझं जन्मदाखला तुमच्याकडे मागितला नाही, तेवढी तुमची लायकीही नाही. तुम्ही कुणी ब्रम्ह्रदेवाचा अवतारही नाहीत. राजकारणात भाजपला पोरंच होत नाहीत
संपूर्ण देशाची फौज मोदींकडे आहे, तरी सुद्धा उद्धव ठाकरेंना ते घाबरतात, कारण, शिवसेनाप्रमुखांचे व तुमच्या रुपाने माझ्या भोवती जे कवच आहे. ते मोदी तुम्ही काय, तुमच्या कित्येक पिढ्या,
मी राजकारणाचं बोलतोय वैयक्तिक नाही, कारण राजकारणात भाजपला पोरंच होत नाहीत. म्हणून त्यांना नकली संतान, आपल्याकडचे गद्दार मांडीवर घ्यावे लागले आहेत, असंही ठाकरेंनी म्हटले आहे.