उद्धव ठाकरे : ‘आरक्षण प्रश्‍नाच्या तोडग्यासाठी मोदींकडेच जावे लागेल’

Photo of author

By Sandhya

उद्धव ठाकरे

मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्याच्या पार्श्‍वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आरक्षणाविषयी भूमिका मांडली. आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचे अधिकार केवळ केंद्र सरकारला आहेत.

त्यामुळे आरक्षण प्रश्‍नाच्या तोडग्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच जावे लागेल, असे त्यांनी म्हटले. ‘केंद्र सरकारने सर्वमान्य तोडगा काढल्यास पाठिंबा देऊ’, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचे अधिकार राज्य सरकारला नाहीत. बिहार सरकारने वाढवलेली आरक्षणाची मर्यादा सर्वोच्च न्यायालयाने हटवली. लोकसभेतच तो प्रश्‍न सुटू शकतो.

त्यासाठी आमचे खासदार पाठिंबा द्यायला तयार आहेत. मराठा समाजाला न्याय मिळावा असे मला वाटते. तो न्याय राज्यात आताचे राज्यकर्ते असताना मिळेल असे वाटत नाही, अशी टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली.

Leave a Comment