उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारशी युती करत उपमुख्यमंत्री झाले. या प्रवेशानंतर पहिल्यांदाचा ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे अजित पवार यांच्या भेटीस गेले.
त्यांच्या भेटीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या या भेटीवर राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. जाणून घेवूया जुन्या सहकाऱ्यांच्या भेटीमागील कारण
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी वर्षभरापूर्वी शिवसेनेत आपल्या काही समर्थकांसह बंड करत भाजपशी युती केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले.
वर्षभरानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार हे समर्थक आमदारांसह सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांनी २ जुलै २०२३ राेजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
या घडमोडीमुळे राज्याच्या राजकारणासह महाविकास आघाडीत राजकीय उलथापालथ झाली. या राजकीय नाट्यानंर पहिल्यांदाच ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे अजित पवार यांच्या भेटीस गेले होते.उद्धव ठाकरे म्हणाले की, अजित पवार यांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. त्यांनी चांगले काम करावे यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.