उद्धव ठाकरे : “भाजपला राजकारणात मुलं झाली नाहीत, त्यांना आमची मुलं”…

Photo of author

By Sandhya

उद्धव ठाकरे

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रचार काल संध्याकाळी थांबला. या प्रचारात आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण पाहायला मिळत आहे. दरम्यान, राजन विचारे यांच्या प्रचारासाठी आज उद्धव ठाकरे यांची ठाणे मतदारसंघात सभा घेतली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. यावेळी बोलताना, “आमचा धनुष्यबाण चोरुन तुम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेबाबत वार केला.

पवित्र भगव्याला तुम्ही कलंक लावला. धनुष्यबाण गद्दाराला दिला, आता तुमची पंतप्रधानपदाची खुर्ची काढून घेतल्याशिवाय महाराष्ट्र गप्प राहणार नाही. महाराष्ट्राने ठरवले तर कमळाबाईला एकही जागा निवडून द्यायची नाही तर मोदींचे सरकार आपण महाराष्ट्रातच गाडून टाकत आहोत.

ही महाराष्ट्राची ताकद आहे. महाराष्ट्राच्या तोंडातील घास काढून तो गुजरातला नेत असाल तर आम्ही तो हात कापून टाकल्याशिवाय राहणार नाही”, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

महाराष्ट्र कोणाच्या पाठीत वार करत नाही पुढे त्यांनी, “मोदी यांना आव्हान आहे की, त्यांनी ४०० पार सभा घ्याव्यात आणि महाराष्ट्र जिंकून दाखवावा. महाराष्ट्र कोणाच्या पाठीत वार करत नाही आणि महाराष्ट्राच्या पाठीत वार झाला तर वाघनखं बाहेर काढल्याशिवाय राहत नाही.

तुम्ही जे सांगत आहात की, मुंबईमध्ये खिचडी घोटाळा झाला. याआधी तुमच्या पीएम केअर फंडामध्ये किती घोटाळा झाला ते सांगा. पीएम केअर फंडाचा मालक कोण? मोदीजी उद्या पंतप्रधान नसणार, मग तो फंड कोणाच्या हातात जाणार? खासगी फंडाचे नाव पीएम केअर ठेवू शकतो का?”, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

भाजपाला आमची मुलं कडेवर घेऊन तसेच “दुसऱ्यांच्या गळ्यातील मंगळसुत्राकडे तुम्ही लक्ष देता, मग पीएम केअर फंडामध्ये झालेल्या घोटाळ्याबाबत का काही बोलत नाहीत. ज्याला मुलं जास्त त्यांना संपत्ती वाटून टाकली जाणार, असे सर्वांना घाबरवले जात आहे.

आता राजकारणामध्ये भाजपाला मुलं होत नाहीत, त्याला मी काय करू. त्यामध्ये माझा काय दोष आहे. मी त्यांना भाकड जनता पार्टी यासाठी म्हणतो की, भारतीय जनता पार्टीला राजकारणात मुलंच झाली नाहीत. कारण त्यांना आमची मुलं कडेवर घेऊन फिरावे लागत आहे”, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केली.

Leave a Comment