![उद्धव ठाकरे](https://dainikesandhya.com/wp-content/uploads/2024/04/Untitled-design-2024-04-22T180835.085.png)
लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांची आघाडी इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स (इंडिया) ३०० हून अधिक जागा जिंकेल. सत्ताधारी पक्ष (भाजप) आपल्या पक्षाला ‘बनावट’ शिवसेना म्हणणाऱ्या लोकांना धडा शिकवला जाईल, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे उमेदवार प्रताप जाधव यांच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र खेडेकर उभे असून खेडेकर यांच्या समर्थनार्थ बुलढाण्यातील सभेला संबोधित करताना ठाकरे बोलत होते. यावेळी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) प्रणाली आणि कृषी धोरणांवर ठाकरे यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर निशाणा साधला.
ठाकरे म्हणाले की, भाजपने त्यांना (राजकीयदृष्ट्या) संपवल्याचा दावा केला आहे, परंतु तरीही त्यांना दररोज लक्ष्य केले जाते. तुम्ही माझ्या पक्षाला ‘फेक’ शिवसेना म्हणता, पण हीच शिवसेना तुम्हाला तिची खरी ताकद आणि तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल.
माझी शिवसेना तुमच्या (पंतप्रधान मोदी) पदवीसारखी आहे का, जिला तुम्ही खोटे म्हणता? विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला ‘बनावट’ म्हटले होते.
निवडणूक आयोगाने आपल्याकडील नाव (शिवसेना) आणि निवडणूक चिन्ह (धनुष्यबाण) हिसकावून ‘देशद्रोह्यांना’ दिले, असा आरोप ठाकरे यांनी केला.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या संदर्भात ते म्हणाले, आता निवडणूक आयोगाने आम्हाला ‘जय भवानी’ म्हणू नका, असे सांगितले आहे.
आमंच्या पक्षाच्या नवीन गाण्यातून ‘जय भवानी’ आणि ‘हिंदू’ हे शब्द काढून टाकण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाकडून नोटीस मिळाली आहे, परंतु ते आम्ही पालन करणार नाहीत.
ठाकरे म्हणाले, देशात लोकशाही अजूनही जिवंत आहे आणि तिचे रक्षण करण्यास महाविकास आघाडी सक्षम आहे. आम्हाला मिळत असलेल्या माहितीनुसार, इंडिया आघाडी ३०० हून अधिक जागा जिंकेल. पण लढा सोपा नाही. आपल्याला हुकूमशाहीचा पराभव करायचा असून मत वाया जाणार नाही याची काळजी घ्या.
ठाकरेंनी यावेळी प्रफुल पटेल यांनाही लक्ष्य केले. ते म्हणाले, पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर (ड्रग स्मगलर) इक्बाल मिर्चीशी संबंध असल्याचा आरोप केला होता, पण आता त्यांना एअर इंडिया प्रकरणात ‘क्लीन चिट’ देण्यात आली आहे.
गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर माजी नागरी विमान वाहतूक मंत्री पटेल यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला होता. ठाकरे यांनी विचारले, “आता मोदी त्यांच्या (पटेल) जवळ आल्याने आनंदी आहेत. मोदीजी, तुमचा खरा चेहरा नक्की काय आहे?