उद्धव ठाकरे : सुरतेचे दोघे महाराष्ट्र लुटताहेत, यांना नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही…

Photo of author

By Sandhya

उद्धव ठाकरे

आज महाराष्ट्र दिन आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी जो लढा संपूर्ण महाराष्ट्राने दिला, रक्त सांडलं, हुतात्मे दिले त्या संघर्षाची यशोगाथा सांगणारा आजचा दिवस आहे. महाराष्ट्राचा आकस महाराष्ट्र स्थापनेवेळी दिसला, मोरारजी देसाईंनी गोळीबाराचे आदेश दिले होते.

सूरतेचे दोन जण महाराष्ट्र लुटताहेत. या गद्दारांचे दोन बापही महाराष्ट्राचे गद्दार आहेत, मी शपथ घेतली आहे की महाराष्ट्राला लुटणाऱ्या लुटारूंचा सुपडा साफ केल्याशिवाय मी राहणार नाही.

महाराष्ट्राला जे लुबाडताहेत, ओरबाडताहेत त्यांना नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही. ही शपथ घेऊन मी मैदानात उतरलो आहे, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. मोदींचं सरकार हे गझनी सरकार असून मोदींनी आता गाईवर बोलतात तसं महागाईवर बोललं पाहिजे.

चाय पे चर्चा करता, तसं मुद्द्यांवरही चर्चा केली पाहिजे, असं थेट आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हातकणंगलेतून केलं. महाविकास आघाडीचे हातकणंगले लोकसभेचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते.

‘मी तुमची माफी मागतो कारण मागच्यावेळी मीच तुम्हाला सांगितलं होतं. मला वाटलं नावासारखा असेल पण इतकं धैर्य हरणारा माणूस मी नव्हता पाहिला. पण गद्दारी माझ्याशी झालेली नाही. हा तर खोकेबाज निघालाच पण ज्या मोदींसाठी मी मतं मागितली होती, त्या मोदी सरकारने महाराष्ट्राशी द्रोह केलाय, गद्दारी केली.

माझ्यासोबत इथे असणाऱ्यांचा पराभव जाणूनबुजून केला गेला. हे भाजपवाले इतके नालायक आहेत. संपूर्ण देशात भाजपला कुणी जवळ घेत नसताना शिवसेनेने खांद्यावर बसवून महाराष्ट्र दाखवला.

नाहीतर तुम्हाला खांदा द्यायला आज महाराष्ट्रात माणूस दिसला नसता. पण तुम्ही माझ्या शिवसैनिकांचा वापर केला आणि शिवसेनेच्या निवडणुकीत पाडापाडीचे धंदे केले. मी याचा सूड घ्यायला आलोय.’ असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Leave a Comment