मराठा आरक्षणाबाबत सोमवारी व मंगळवारी नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात चर्चा होणार असल्याची माहिती शिवसेनेचे उपनेते, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आमचे सरकार सर्वतोपरी सहकार्य करत आहे. त्यासाठीच समितीही नेमण्यात आली आहे. दि. 24 डिसेंबरपर्यंत ही समिती अहवालही सादर करेल.
तत्पूर्वी यावर अधिवेशनात चर्चा होणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत अगदी अभ्यासपूर्ण अहवाल तयार केला होता.
तेव्हापासून आतापर्यंत त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत. केवळ आरक्षण जाहीर न करता ते कायमस्वरूपी टिकणारे असावे, यासाठी शिंदे, फडणवीस सरकार प्रयत्न करत आहे. निश्चितच आमचे सरकार मराठा आरक्षण देईल, यावर माझा पूर्ण विश्वास आहे, असे सामंत म्हणाले.