देशाचे पंतप्रधान मोदी यांनी विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे. मोदींचा देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. त्यामध्ये आपलाही वाटा असावा, योगदान असावे, असे प्रत्येक नेत्याला वाटत आहे. त्यामुळे अनेक नेत्यांची भाजपमध्ये येण्याची इच्छा आहे.
महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या भाजपप्रवेशामुळे महायुतीची ताकद निश्चितपणे वाढणार आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.१३) व्यक्त केली.
अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. आज त्यांनी मुंबईतील भाजप कार्यालयात भाजपचे प्रदेशाध्य़क्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
फडणवीस म्हणाले की, अशोक चव्हाण यांच्यानंतर हजारो कार्यकर्ते आणि नेते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे महायुतीला बळ मिळेल, त्याचा आम्हाला फायदा होईल, भाजपची शक्ती वाढेल.
महाराष्ट्र आणि विशेष करून मराठ्यावाड्यात भाजपची ताकद वाढणार आहे. पदाची कोणतीही अपेक्षा न ठेवता चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, असे फडणवीस म्हणाले.
मोदींनी विकासाची कामे केली आहेत. त्यावर प्रभावित होऊन मोदींच्या विकासात्मक कामाला साथ देण्यासाठी अनेक नेते भाजपमध्ये येत आहेत, असेही ते म्हणाले.