पंढरपूर | वसंत पंचमीत श्री विठ्ठल – रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा थाटातलाखो भक्तानी अनुभवला याची देही याची डोळा

Photo of author

By Sandhya

पंढरपूर :

वसंत पंचमीचे औचित्य साधून श्री विठठल रुक्मीणी मातेचा शाही विवाह सोहळा पंढरपूरात लाखो भक्तांच्या साक्षीने पार पडला .मंदिर समितीच्या वतीने हा शाही विवाह सोहळा साजरा करण्यात आला. वसंत पंचमी ऋतू दिवशी भगवंताचा विवाह झाल्याची अख्यायिका आहे.

वसंत ॠतू ही भगवंताची विभूती असल्याने भगवंताला आनंद व्हावा. भगवंताचा जो सोहळा जिवाच्या कल्याणा करिता झाला त्या निमित्ताने भगवंताची कृपा आपल्याला प्राप्त करता यावी म्हणून हा विवाह सोहळा केला जातो.

देवाच्या या शाही विवाह सोहळयासाठी राज्याच्या विविध भागातुन हजारो भाविक व-हाडी मंडळींनी उपस्थिती लावतात.
विवाह सोहळ्याची शेकडो वर्षाची परंपरा असल्याचे मंदिर समिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यानी सांगितले.
दुपारी १२ वाजता मंदिरातील मुख्य सभा मंडपात लाखो वऱ्हाडींच्या साक्षीने . आक्षात विवाह सोहळा करण्यात आला .

यावेळी महिला भाविक देवाच्या गाण्यावर ठेका धरला. विवाह सोहळ्यासाठी श्री विठू रखुमाईच्या दोन मूर्तींना नवरा नवरी प्रमाणे दागदागिने आणि भरजरी पोशाख घालून नटविण्यात आले.

देव ब्राह्मणांच्या साक्षीने सात मंगल अष्टका म्हणून तांदूळ आणि फुलांचा वर्षावात आध्यात्मिक विवाह सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याच्या निमित्ताने मंदिरातील मूळ मूर्त्यांची विधिवत पूजा करून देवाच्या अंगावर गुलालाची उधळण करण्यात आली.

या दिवसापासून देवाला रोज पांढरा पोशाख घालून रंग पंचमी पर्यत अंगावर रंग टाकला जातो. सर्वसामान्यांचा विवाह सोहळा आपण पाहतो, तसाच सोहळा विठ्ठल रखुमाईचा सोहळा याची देही याची डोळा भाविकांना अनुभवता येतो.

लग्न सोहळा पार पडल्यानंतर आलेल्या वऱ्हाडी लोकांची जेवणाची व्यवस्था मंदिर समितीच्या वतीने करण्यात आली होती. जेवणामध्ये बंदी लाडू, बालूशाही, खारी बुंदी, चपाती, भाजी, कोशिंबीर आदी नऊ पदार्थाची वर्हाडी मंडळींसाठी मेजवाणी ठेवण्यात आली .
राज्य भरातून येणाऱ्या हजारो व-हाडी भाविक मंडळी साक्षात भगवंताचा विवाह सोहळा याची देही याची डोळा अनुभवला.
जिप्सी, डिजी, सुर्यफुल, गुलाब, रेड गुलाब, पांढरा गुलाब, पिंक गुलाब, पिवळा गुलाब, जरबरा, ऑर्किङ जिनियम, तगर, गुलछडी, कामिनी, तुक्स, गोंडा (लाल पिवळा) बिजली, अस्टर, शेवंती, पासली, काडी, गिलाडो, डीर्शना इत्यादी सुमारे साडेतीन ते चार टन फुलांचा आणि 1 टन ऊसाचा वापर करण्यात आला आहे.

श्रींचा गाभारा, विठ्ठल सभामंडप, श्री संत नामदेव महाराज पायरी, उत्तर द्वार (VIP Gate), सोळखांबी, रुक्मिणी सभामंडप, मिरवणूक रथ या ठिकाणी सजावट करण्यात आली आहे.

Leave a Comment