अतिशय धक्कादायक…! सावत्र बापाकडून २ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या

Photo of author

By Sandhya

सावत्र बापाकडून २ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या

मुंबईमध्ये २ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे. सावत्र बापानेच हे कृत्य केले आहे. मुंबईच्या मानखुर्द परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मानखुर्द पोलसांनी २५ वर्षीय आरोपी बापाला अटक केली आहे. या घटनेमुळे मानखुर्दमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मानखुर्द परिसरामध्ये ही चिमुकली आपल्या आई आणि सावत्र बापासोबत राहत होती. महिलेचा पहिल्या पतीपासून घटस्फोट झाला होता. त्यामुळे ती आरोपीसोबत मुलीला घेऊन राहत होती. पण आरोपीला चिमुकली अजिबात आवडत नव्हती. आपल्या नात्यात अडथळा ठरत असल्याच्या रागातून तो चिमुकलीचा सतत राग राग करत होता. या चिमुकलीवर दोघांमध्ये सतत भांडणं देखील होत होती.

महिला कामानिमित्त घराबाहेर पडली. त्यावेळी चिमुकली आणि तिचा सावत्र बाप घरामध्ये होते. यावेळी आरोपीने चिमुकलीच्या गुप्तांगात लाटणं घातलं आणि तिची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर आरोपीने हत्येनंतर सर्व पुरावे देखील मिटवण्याचा प्रयत्न केला. महिला कामावरून घरी आल्यानंतर तिला मुलगी बेशुद्धावस्थेत दिसली.

महिलेने आणि आरोपीने तात्काळ मुलीला जवळच्या रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषीत केले. डॉक्टरांना चिमुकलीच्या गुप्तांगावर काही जखमा दिसून आल्या. तसंच तिच्या अंगावर आणि गळ्यावर काही खुणा देखील दिसून आल्या. डॉक्टरांना संशय आल्यामुळे त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

त्यावेळी आरोपीने मुलगी घरामध्ये खेळताना पडली असल्याचे सांगितले. पण पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली त्याला खाकी दाखवल्यानंतर आरोपीने चिमुकलीची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

Leave a Comment

You cannot copy content of this page