मराठा आरक्षणाचा वाद हा सरकारने सुरु केला आहे. मुळात वाद हा महायुतीने उभा केला आहे. सरकारने शब्द दिला तर पूर्ण करावा, आपसात भांडण लावण्याचे काम केले. आता परिणाम भोगावे लागतील.
आश्वासने कशाला देता? असा सवाल मराठा आरक्षण प्रकरणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला आहे. मविआत तिकीट वाटप हा वादाचा मुद्दा होऊ शकत नाही.
आम्ही मेरिटवर जागावाटप करू. शेवटी निर्णय हायकमांड घेणार आहे. अजून चर्चा झालेली नाही. त्यांचे काय बोलणं झालं? मला माहित नाही. बैठकीत चर्चा करू. राज्यातील जागा वाटपाची अजून चर्चा झालेली नाही.
अंतिम निर्णय केंद्रीय समितीचा आहे. चर्चा नसताना या उगीचच वावड्या आहेत. संजय राऊत काय म्हणाले त्यांना म्हणू द्या. मेट्रो मुंबई संदर्भात राज्याच्या तिजोरीतून 134 कोटी खर्च झाला आहे.
10 ते 15 टक्के खर्च झाला आहे. हेच सर्वत्र सुरू आहे. राज्यात 35 हजार कोटी कंत्राटदारांचे थकले आहेत. 28 डिसेंबरच्या सभेची तयारी जोरात सुरू आहे. 1920 नंतर विदर्भात प्रथमच काँग्रेसचा स्थापना दिवस नागपुरात 28 डिसेंबररोजी साजरा होत आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.