कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना नोटीसविषयी छेडले असता निवडणूक आयोग खिशात घालून भाजपची मंडळी फिरत आहेत. खरंतर हा निवडणूक आयोग बीजेपीचा झाला आहे.
अयोध्येत राम मंदिराचं दर्शन मोफत करून देणार म्हणत मत मागणाऱ्याना नोटीस का दिली जात नाही? धार्मिक भावनांना हात घालून मत मागणे हे कुठल्या संविधानात, आचारसंहितेत आहे.
अर्थातच ही कारवाई करायची असेल देशाचे गृहमंत्री यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. त्यांना नोटीस द्यायला पाहिजे. मात्र, हे सगळं घाबरल्याचा परिणाम असल्याचे परखड मत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे.
शेततमाल भावाबाबत हिवाळी अधिवेशनापूर्वी सरकारने लाज-लज्जा असेल तर त्यांनी केलेल्या घोषणांची पूर्तता करावी. शेतकऱ्यांना तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा.
प्रोत्साहन पर 50 हजार रुपये देणार होते, ते अद्याप मिळालेले नाहीत. आम्ही सरकारच्या लक्षात आणून दिल्यावर दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या वाढवली मदतीची घोषणा केली आहे, मात्र मदत मिळालेली नाही. अधिवेशनात आम्ही सरकारला धारेवर धरू असा इशारा विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला.
हमीभावाची पोकळ घोषणा करतात, हमाभावाने कुठे खरेदी सुरु आहे, सोयाबीन, कापसाचे दर पडलेले आहेत. धान पीक निघायला सुरवात झाली असल्याने सातशे रुपये बोनसची मागणी करतो आहे, सरकारकडून अद्याप पूर्तता झाली नाही.
सरकारने लवकरात लवकर बोनस द्यावे. व्यापाऱ्यांच्या घशात धान गेल्यानंतर घोषणा सरकार करणार आहे का? राजू शेट्टी यांची तीच मागणी आहे. आजच्या चर्चेनंतर आम्ही त्या संदर्भात बोलू असे स्पष्ट केले.
ऑल इंडिया आघाडी बाबत बोलताना स्थानिक पातळीवर चर्चा, चाचपणी सुरू झाली आहे. कुठल्या जागा कोणासाठी मेरिटवर सोडायच्या या संदर्भातील चर्चा सुरू आहे.
पाच राज्याच्या निवडणुकीत संदर्भात निकाल आल्यानंतर जागावाटप संदर्भातही चर्चा होईल. देशाचे राजकारण करणारे, विष पसरवणारे या देशातून हाकललेच पाहिजे. ही सत्ता उलथून लावण्यासाठी एक मुखी निर्णय इंडिया आघाडीच्या नेत्यांनी घेतला आहे यावर भर दिला.