विजय वडेट्टीवार : सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे उघड्या डोळ्याने पहावे…

Photo of author

By Sandhya

विजय वडेट्टीवार

एकीकडे कांदा निर्यात बंदी उठवली म्हणून ढोल वाजवले. दुसरीकडे सोयाबीनला 10 वर्षात सर्वात कमी दर मिळाला. कापूस आजही शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे.

गारपिटीमुळे झालेली नुकसान भरपाई मिळाली नाही. धानाचा बोनस मिळाला नाही. मुळात सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उघड्या डोळ्याने पाहिले पाहिजे, अशी अपेक्षा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

अधिवेशनात अंतरिम बजेटमध्ये जे बजेट येईल त्यावर चर्चा होईल. आमचा प्रस्ताव शेतकरी प्रश्नांवर असणार आहे. सरकार शेतकरी प्रश्नांवर उदासीन असून राज्यात कायदा सुव्यवस्था प्रश्न गंभीर आहे.

मंत्रालयात गुंड्यांचा वावर असून उघडपणे रील बनविले जात आहेत. सरकारचा गुंडावर धाक राहिलेला नाही. भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. अनेक टेंडर कॉस्ट वाढवून दिले जात आहेत.

धारावीमधून 3 हजार कोटींचा TDR देण्यात आला आहे. NMRDA ची जागा अदानीला दिली. त्यातून अदानीला मोठा फायदा होईल, या सरकारच्या कारभारावर येत्या अधिवेशनात अनेक सुरस कथा आम्ही मांडू, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला. 

Leave a Comment

You cannot copy content of this page