विजय वडेट्टीवार : शिंदे समितीने ओबीसींमधील इतर वंचित जातींच्या नोंदी तपासाव्यात

Photo of author

By Sandhya

विजय वडेट्टीवार

मराठा आरक्षणावरुन आता मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण झाला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा विरोध केला.

दरम्यान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला विरोध दर्शवला आहे. तसेच शिंदे समितीने ओबीसींच्या नोंदी तपासाव्या अशी मागणी केली आहे. यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

आरक्षणाची टक्केवारी वाढवून मराठा समाजाला आरक्षण द्या, ओबीसींच्या आरक्षणा धक्का लावू नका. सरसकट आरक्षणाला आमचा विरोध आहे. शेतकऱ्यांच्या सर्वाधीक आत्महत्या विदर्भात होतात. ते ओबीसी आहेत.

ओबीसी समाजाला सर्वकाही मिळते, अशी अफवा पसरवण्यात आली. तुम्ही (मराठा) येणार असाल तर आरक्षणाची टक्केवारी वाढवून घ्या, वेगळा प्रवर्ग घ्या, ओबीस आणि मराठा समाजाला दुखवू नका, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

विजय वडेट्टीवार म्हणाले, शिंदे समितीने कुणबी नोंदी तपासल्या त्याबरोबर ओबीसीतील सर्व वंचित जातीच्या नोंदी शोधाव्या आणि त्यासंदर्भात श्वेतपत्रिका जाहीर करावी.

कुणबी नोंदी शोधत असताना ओबीसीतील अनेक जातींना लाभापासून वंचित राहावं लागत कारण त्यांना वेळेवर नोंदी सापडत नाहीत. ६७ चे पुरावे न मिळाल्यामुळे ओबीसींना लाभापासून वंचित राहावं लागतात.आम्हाला देखील प्रमाणपत्रासाठी भटकावं लागतं. 

Leave a Comment