CRIME NEWS : वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात फरशी टाकून केली हत्या

Photo of author

By Sandhya

वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात फरशी टाकून केली हत्या

पती पत्नीत झालेल्या वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात फरशी टाकून हत्या केल्याची घटना एरंडोल शहरातील गांधीपुरा परिसरात दुपारी घडली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षदा किरण मराठे (वय-२७) असे मयत महिलेचे नाव असून त्या एरंडोल शहरातील गांधीपुरा भागात पती किरण महादू मराठे (वय-३५) याच्या सोबत वास्तव्याला होत्या.

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होते. सोमवारी १९ जून रोजी दुपारी १ वाजता वाद उफाळून आला. यात सतांपाच्या भरात पती किरण मराठे याने पत्नी हर्षदा मराठे यांच्या डोक्यात घरातील फरशी मारली.

यात विवाहिता गंभीर जखमी झाल्या. अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला . या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एरंडोल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीष गोराडे यांनी धाव घेवून पंचनामा केला.

मृतदेह एरंडोल ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आला. तर संशयित आरोपी पती किरण मराठे याला ताब्यात घेतले आहे.

Leave a Comment