संभाजीनगरमध्ये चाललंय काय? शिवजयंती मिरवणुकीत नाचवले गँगस्टर Lawrence Bishnoi चे पोस्टर

Photo of author

By Sandhya



Sambhajinagar Crime News : भक्त आणि अंधभक्त यांच्यात यांच्यात एक पुसट अशी रेषा असते, असं म्हटलं जातं. याचा प्रत्यय अहिल्यानगरमधील शिवजयंती कार्यक्रमात पहायला मिळाला. अहिल्यानगरमध्ये काढण्यात आलेल्या एका शिवजयंती मिरवणुकीत एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राजकीय नेत्यांसह चक्क कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचे फलक झळकवले अन् गाण्याच्या तालावर नाचवले सुद्धा.. पाठीमागील बाजूस भाजप नेते आणि मंत्री नितेश राणेंचाही फोटो होता. त्यामुळे हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच संभाजीनगरमध्ये देखील असाच प्रकार पहायला मिळाला.

लॉरेन्स बिश्नोईचे पोस्टर्स झळकावले

शिवजयंती मिरवणुकीत डीजेच्या तालावर नाचताना कार्यकर्त्यांनी स्वातंत्रवीर सावरकर, नथुराम गोडसे याच्यासह मंत्री नितेश राणे यांच्या बरोबर कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो असलेले पोस्टर्स झळकावले. बिश्नोईच्या फलकावर ‘आय एम ए हिंदू. एमॅड ए मॅड’ असं लिहिले होतं. सार्वजनिक निवडणुकीमध्ये अशा प्रकारे गँगस्टरचे फोटो झळकवण्याचा उद्देश काय? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे. संभाजीनगरमध्ये गांधी द्वेष लिहिलेल्या एका पोस्टवर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो झळकल्याचं दिसून आलं.

अहिल्यानगरमध्ये काय चाललंय?

आम्ही गांधीला नाही तर शिवाजी महाराज आणि महाराणा यांच्यासारख्या धुरंधरांना मानणारे आहोत, असं या पोस्टवर लिहिलं गेलं आहे. जय श्री रामच्या घोषणा देखील यावेळी दिल्या गेल्या. बिष्नोईचे फोटो झळाकल्यामुळे संभाजीनगरात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. तर अहिल्यानगरमध्ये काय चाललंय? असा सवाल विचारला जात आहे.

शिवरायांच्या मावळ्यांना शोभतं का?

गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत होणारे वाद लक्षात घेऊन पोलिसांनी देखील फलक झकळावण्यास बंदी घातली होती. तरी देखील कुख्यात गँगस्टरचे फोटो झळकल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं, आता त्यांच्या मावळ्यांनी गुन्हेगारांचे पोस्टर झळकावणं कितपत योग्य आहे? असा सवाल विचारला जात आहे.

दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येत लॉरेन्स बिष्णोई टोळीचा सहभाग होता. अशातच आता समाज माध्यमांचा वापर करून ही टोळी राज्यात हातपाय पसरत आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीत सुमारे 700 सदस्य असल्याची माहिती आहे. लॉरेन्स बिश्नोईने आपल्या टोळीतील प्रत्येकाची विभागणी केली. पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, महाराष्ट्र, झारखंड आणि गुजरात या 11 राज्यांमध्ये लॉरेन्सचे गुंड सक्रिय आहेत. अशातच लहान मुलं सोशल मीडियाच्या आहारी जाऊन गुन्हेगारीकडे वळत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

Leave a Comment