इंदापूर: चाकूने वार करुन महिलेचा खून…

Photo of author

By Sandhya

निमगांव केतकी-सराफवाडी रोडवर घटना……आरोपी इंदापूर पोलिसांच्या ताब्यात

इंदापूर

इंदापूर तालुक्यातून धक्कादायक बातमी आहे.चाकूने सपासप वार करुन एका तेहत्तीस वर्षीय महिलेचा खून करण्यात आलाय. सुनिता दादाराव शेंडे वय ३३ वर्षे असं खून झालेल्या महिलेचे नांव असून ती इंदापूर तालुक्यातील शेंडेवस्ती निमगांव केतकी येथील रहिवासी आहे.

याप्रकरणी आरोपी ज्ञानेश्वर बबन रासकर रा. सुरवड ता. इंदापुर जि.पुणे याच्या विरोधात इंदापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पहाटे चार च्या सुमारास आरोपीला इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाले आहे

ही घटना दि.04 डिसेंबर रोजी रात्री सव्वा आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास निमगाव केतकी सराफवाडी रोडवरील अजिनाथ मोरे यांच्या पत्र्याच्या शेडखाली घडलीय. सदर या घटनेचा पुढील तपास बारामतीचे पोलीस अधीक्षक सुदर्शन राठोड व त्यांचे सहकारी करीत आहे.

Leave a Comment