योगी आदित्यनाथ : ‘400 पारची चर्चा झाली तर काँग्रेस-आपला चक्कर येऊ लागते…’

Photo of author

By Sandhya

योगी आदित्यनाथ

दिल्लीतील सातही जागांसाठी भाजपने आपली पूर्ण ताकद लावली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पूर्व दिल्लीतील मयूर विहार भागात एका जाहीर सभेला संबोधित करताना योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस आणि आम आदमी पार्टीवर निशाणा साधला ते म्हणाले,’आम आदमी पार्टी आणि काँग्रेस पक्ष आघाडीला चक्कर येऊ लागली आहे.’

आम आदमी पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना मिळून 400 जागांवर निवडणूक लढवता येणार नाही. त्यामुळे ते घाबरले आहे. योगींनी इंडिया आघाडीवरही हल्लाबोल करत म्हटले की, ‘इंडिया आघाडीचे सदस्य राममंदिरावर प्रश्न उपस्थित करतात. त्याची आजची अवस्था पाहिल्यावर समजू शकते.’

योगी पुढे म्हणाले की,’जेव्हा हे दोन्ही पक्ष 400 ओलांडल्याचं वास्तव विचारण्यासाठी जनतेसमोर जातात तेव्हा त्यांना जनतेकडून एकच उत्तर मिळतं की, ‘ज्यांनी राम आणला त्यांना आम्ही आणू’ दरम्यान, पूर्व दिल्लीतून भाजपचे उमेदवार हर्ष मल्होत्रा यांच्या प्रचारासाठी योगी आले होते.

सीएम योगींनी आम आदमी पार्टीवर निशाणा साधला आम आदमी पक्षावर निशाणा साधत मुख्यमंत्री योगी म्हणाले की, आप सरकारने देशाची राजधानी दिल्लीचे काय केले आहे.

यूपीचा विकास बघायचा असेल तर दिल्लीची तुलना उत्तर प्रदेशातील गाझियाबाद आणि नोएडाशी करा. दिल्लीच्या आम आदमी पक्षाच्या सरकारने दिल्लीला नरक बनवले आहे.’

Leave a Comment

You cannot copy content of this page