‘सुरवात तुम्ही केली, शेवट मी करणारच’ – रामराजेंच्या स्टेटसने राजकीय वर्तुळात चर्चा

Photo of author

By Sandhya


सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी व गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट येथे मागील ५ दिवसांपूर्वी आयकर विभागाची धाड पडली होती तब्बल पाच दिवस चाललेल्या या आयकर विभागाचा छापा काल दि ९ रोजी सायंकाळी संपला यानंतर श्रीमंत संजीवराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन आयकर विभागाच्या छाप्यामध्ये मध्ये कोणतीही चुकीची गोष्ट अधिकाऱ्यांना आढळली नसून आमचं कोणतही बँक खात आयकर विभागाने गोठवल नाही व आमची कोणतीही रक्कम व दागिने आयकर विभागाने जप्त केले नसल्याचे सांगितले होते या सर्व घडामोडी वर विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी ‘सुरुवात तुम्ही केली याचा शेवट मी करणारच’ अशा आशयाच व्हाट्सअप स्टेटस ठेवले आहे त्यामुळे नक्की हा इशारा त्यांनी कोणाला दिला आहे याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे

Leave a Comment

You cannot copy content of this page