पुणे | जि.प. च्या बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता बाबुराव पवार, उपअभियंता दत्तात्रेय पठारे आणि कनिष्ठ अभियंता अंजली बगाडे अँटी करप्शनच्या ‘जाळ्यात

Photo of author

By Sandhya


पुणे : केलेल्या कामाची पाहणी करणार्‍या समितीला देण्यासाठी, बिलाची फाईल मंजूर करुन वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी आणि फाईल मंजूर करुन बिल काढण्यासाठी अशा प्रकारे एकाच कामासाठी एकाच कार्यालयात तब्बल तीन ठिकाणी ते ही प्रत्येकी २ टक्के लाच द्यावी लागत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे एकाच वेळी एकाच कार्यालयातील तीन वेगवेगळ्या अधिकार्‍यांना एकाच कामासाठी लाच देताना पकडण्यात आले असून ही पहिलीच वेळ आहे.

कार्यकारी अभियंता बाबुराव कृष्णा पवार (वय ५७), उपअभियंता दत्तात्रेय भगवानराव पठारे (वय ५५) आणि कनिष्ठ अभियंता अंजली प्रमोद बगाडे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे तिघेही जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात कार्यरत आहेत.

तक्रारदार हे शासकीय ठेकेदार असून त्यांच्या फर्मच्या नावाने शासकीय टेंडर घेत असतात. कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग यांनी दौंड तालुक्यातील खुटबाव रोड ते गलांडवाडी पांदन शिव रस्ता व गलांडवाडी मंदिर ते ज्ञानदेव कदम घर रस्ता या कामाचे टेंडर सप्टेंबर २०२४ मध्ये प्रसिद्ध केले होते. तक्रारदार यांनी या दोन कामाची वर्कऑर्डर मिळाली होती. या कामाच्या रक्कमेमध्ये जीएसटी व इतर कर अशी दोन्ही कामाची बिलाची रक्कम ४० लाख रुपये होत आहे. ही कामे केल्यानंतर तक्रारदार यांनी ३ मार्च २०२५ रोजी कनिष्ठ अभियंता अंजली बगाडे यांनी तक्रारदार यांनी केलेल्या कामाच्या ठिकाणी जाऊन पुणे जिल्हा परिषदेकडील एस क्यु एम कमिटी केलेल्या कामाची पाहणी करुन अहवाल देईल. त्यासाठी या कमिटीकरीता प्रत्येक कामापोटी ७ हजार रुपये असे दोन कामाकरिता १४ हजार रुपयांची लाच मागितली. तसेच तक्रारदाराच्या दोन कामाच्या बिलाची फाईल तयार करुन मंजुरीसाठी ऑनलाईन सादर करण्यासाठी कामाच्या बिलाच्या रक्कमेच्या २ टक्के प्रमाणे ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

Leave a Comment