
पुणे – अंमली पदार्थ विरोधी पथक १, गुन्हे शाखा पुणे शहर यांनी गांजाची अवैधरित्या विक्री करणाऱ्या दोन रेकॉर्डवरील सराईत आरोपींना आंबेगाव बुद्रुक परिसरातून अटक केली. त्यांच्या ताब्यातून २१ किलो ९७१ ग्रॅम गांजा, दोन मोबाईल फोन, एक दुचाकी असा एकूण ₹४,८४,४२०/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत नियमित पेट्रोलिंगदरम्यान शनिनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर संशयित अवस्थेत दुचाकीवर थांबलेले अक्षय अकुश माने (३०, रा. घोरपडी पेठ) व यश राजेश चिवे (१९, रा. दांडेकर पुल) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या नायलॉन पोत्याची झडती घेतली असता त्यामध्ये खाकी टेपने बंदिस्त ९ पाकिटांमध्ये भरलेला गांजा आढळून आला. आरोपी गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने सदर पदार्थ जवळ बाळगत असल्याची कबुली त्यांनी दिली.
या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं. १४६/२०२५, NDPS कायद्याच्या कलम ८(क), २०(ब)(ii)(क), २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईचे नेतृत्व व कौतुकास्पद कामगिरी
सदर यशस्वी कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख,
मा. पोलीस उपआयुक्त (आर्थिक व सायबर गुन्हे) श्री. विवेक मासाळ,
मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे १) श्री. गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलिस निरीक्षक श्री. प्रशांत अन्नछत्रे, सहा. पो.नि. अनिल सुरवसे,
अणि त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार –
दयानंद तेलंगे, प्रविण उत्तेकर, विनायक साळवे, सर्जेराव सरगर, सचिन माळवे, संदीप शिर्के, विपुल गायकवाड, मारुती पारधी, विशाल दळवी, संदेश काकडे, दत्ताराम जाधव आणि स्वप्नील मिसाळ यांनी संयुक्तपणे केली.
अंमली पदार्थ विक्रीस विरोधात गुन्हे शाखेची सशक्त कारवाई सुरूच आहे.
पुणे पोलिसांकडून अवैध ड्रग्स नेटवर्कवर प्रचंड धडक.