




हिंगोली :- आंबेडकरी चळवळीतील धडाडीचे नेते म्हणून सर्व जिल्ह्याभरात परिचित असलेले रवींद्र वाढे यांनी शनिवारी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे माजी मंत्री धनंजय मुंडे महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष बिडी बांगर यांच्या नेतृत्वाखाली
जाहीर प्रवेश केला त्यांच्या सोबत शेख अतिखुर रहमान रघुवीर हनवते संदीप खंदारे बबन भुक्ततर शिवाजी इंगोले प्रल्हाद धाबे दिपक केळे यांनी देखील प्रवेश केला.
रवींद्र वाढे यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मोठ्या फायदा होणार आहे तसेच हिंगोली नगरपालिका क्षेत्रात देखील त्यांचा मोठा जनाधार आहे
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष बिडी दादा बांगर आमदार राजू भैया नवघरे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिव्यांग सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष रामदास पाटील प्रदेशचिटणीस प्रकाशराव थोरात अनिल पतंगे दूल्हे खान पठाण सुजय देशमुख महेश थोरात स्वप्निल इंगळे विलास आघाव यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.