उरुळी कांचन येथे चोरट्यांनी मोबाईलचे दुकान फोडून अंदाजे कोटी रुपयांच्या ब्रँडेड मोबाईलची चोरी केली असल्याची घटना उघडकीस आली आहे.
हवेली तालुक्यातील उरुळी कांचन परिसरात गेले काही दिवसापासून चोरांनी धुमाकूळ घातला असुन आता चक्क चोरांनी पोलीस स्टेशनच्या काही अंतरावरच चोरी केली आहे. हि चोरी अंदाजे कोट रुपयांच्या मालाची केली असुन पोलीसांनाच आव्हान केले असल्याची घटना घडली आहे. दोन मोबाईल दुकानातून अंदाजे कोटी रुपयांच्या ब्रँडेड मोबाईलची चोरी झाली असल्याची चर्चा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज (ता. १९ जून ) गुरुवार रोजी राञी उरुळी कांचन पोलीस स्टेशन जवळच उरुळी कांचन मधील सर्वात दोन मोठ्या मोबाईल शॉपी चोरट्यांनी फोडल्या असल्याची घटना पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली आहे. या दोन मोबाईल दुकानातून अंदाजे कोटी रुपयाच्या आसपास ब्रँडेड मोबाईल सह माल चोरट्यांनी लंपास केला असल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच घटनेची माहिती मिळताच दौंड उप विभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी घटनास्थळी पाहणी करुन भेट दिली. तसेच एका दुकानातून अंदाजे 157 मोबाईल चोरी गेले तर दुसऱ्या दुकानातील किती मोबाईल गेले हि माहिती अद्याप मिळू शकली नाही.
(ता. १० जुन) रोजी काही अंतरावरच पोलीस नाकाबंदी असुन देखील वटपोर्णिमे दिवशी भर दिवसा कब्रस्तान शेजारी चहा विक्रेते महिलेची सोन्याची अंगठी चोरट्यांनी लंपास केली.(ता. १६ सोमवार) रोजी भर दिवसा सकाळी साडेसात वाजण्याचे दरम्यान एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले (ता.१८ बुधवार) तीन ठिकाणी चोऱ्या झाल्या आहेत. अशा अनेक चोऱ्या उरुळी कांचन परिसरात झाल्या.प्रत्येक ठिकाणी चोर सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत.
उरुळी कांचन येथील नागरिकांचा सवाल केला आहे कि उरुळीत चालय तरी काय ? उरुळी कांचन ची सुरक्षा राम भरोसे का ?… उरुळी कांचन परिसरात सततच्या चोरीच्या होत असल्याने नागरिकांमधे घबराटीचे वातावरण पसले आहे.
कालच माल खरेदी केला होता. आमच्या दुकानात ७० ते ७५ लाखाच्या आसपास माल होता. तोडलेल्या शटर मधून अस दिसतय कि जवळजवळ सगळा माल चोरांनी नेला आहे. कॅमेऱ्याचे मशीन फोडले आहे. असे मोबाईल दुकानदार रोहन थोरात, यांनी सागितले.
“उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीतील यापूर्वी चोरीच्या प्रकरणात एक टीम काम करत असुन आज जी घटना घडली आहे त्याकरिता दुसरी टीम रवाना करत आहे. लवकरच आरोपी पोलिसांच्या ताब्यात असतील असे अविनाश शिळीमकर- वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पुणे. यांनी सांगितले.
उरुळी कांचन येथे अंदाजे कोटी रुपयांच्या ब्रँडेड मोबाईलची चोरी