ऋतुजा राजगेच्या मृत्यूचा शिरूरला महेशदादा लांडगेंच्या उपस्थितीत निषेध

Photo of author

By Sandhya


सांगली शहरातील यशवंत नगर येथे राहणाऱ्या सौ ऋतुजा सुकुमार राजगे या उच्च शिक्षित विवाहित महिलेने, सासरच्या ख्रिश्चन धर्मांतराच्या जाचाला कंटाळून, सात महिन्याच्या गरोदरपणात आपले जीवन संपवले. या घटनेचा जाहीर निषेध सर्वत्र होत आहे.
याच पार्श्वभूमीवर शिरूर येथेही शनिवार दि 28 जून 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जाहीर मोर्चा काढण्यात आला.
यावेळी भाजपच्या प्रदेश सचिव वर्षाताई डहाळे, भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे, आमदार पडळकर यांचे बंधू नवनाथ पडळकर, ह भ प संग्राम बापू भंडारे महाराज, रेखाताई मंगलदास बांदल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
तसेच भाजप चे तालुकाध्याईश राहुल पाचर्णे, माजी तालुकाध्यक्ष भगवान शेळके, ॲड धर्मेंद्र खांडरे, अनिल काशिद, पै. रामभाऊ सासवडे, वैजयंती राजेंद्र चव्हाण तसेच सकल हिंदू समाज बहुसंख्येने उपस्थित होता.

Leave a Comment