एमआयडीसी परिसरात वाहने नियोजित जागेवरच पार्किंग करावी-अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार

Photo of author

By Sandhya

बारामती, दि.२०: महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ आवारातील वाहने नियोजित जागेवरच वाहने पार्कींग करावी, वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करुन सहकार्य करावे, नियमांंचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करावी,असे निर्देश अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिले.

बारामती विमानतळ ते पेन्सिल चौक एमआयडीसी आवारातील रस्त्यावरील वाहनांच्या पार्किंग समस्या आणि उपयोजनांबाबत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे मंगळवारी (दि.१९) आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड दुरदृष्यप्रणालीद्वारे) तसेच प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम आदी उपस्थित होते.

श्री. बिरादार म्हणाले, वाहतुक सुरक्षा विषयक नियमाबाबत माहिती देण्यासह वाहनधारकांची बैठक आयोजन करावे.
वाहने रस्त्यांवर उभे करु नये याबाबत चालकास सुचना एमआयडीसी आणि कंपनीने सूचना घ्याव्यात.वाहतूक सुरक्षितेच्या नियमाचे पालन करावे असे सर्व कंपनीतील कर्मचारी व अधिकारी यांना माहिती देण्यात यावी,असेही श्री. बिरादार म्हणाले.

श्री. नावडकर म्हणाले, ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी वाहतूकीच्या अनुषंगाने सूचना केल्या, या सुचनाबाबत प्रशासनाच्यावतीने सकारात्मक विचार करण्यात येईल, असे श्री. नावडकर म्हणाले.

श्री. पाटील म्हणाले, एमआयडीसी परिसरातील वाहतुक कोंडी सोडवण्याकरिता वाहन पार्किंगच्या अनुषंगाने नियोजन करण्यात येईल. वाहणकरिता टर्मिनल तयार करुन त्यावर वाहनाची पार्कींग करण्याबाबत कंपनीला सूचना देण्यात आल्या. वाहनांना पार्किंगकरिता पार्किंग यार्डची नेमून देण्यासह वाहन चालकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अशी सुचना श्री. पाटील यांनी केली.

यावेळी वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक वैशाली पाटील, नायब तहसीलदार पी.डी. शिंदे, ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष अॅड. तुषार झेंडे पाटील, तालुका अध्यक्ष संजीव बोराटे, एमआयडीसी परिसरातील पॅजिओ कंपनी, गजानन अॅग्रो कंपनी, बारामती कॅटल फुड कंपनी, भारत फोर्ज कंपनी, मोरया गोदरेज व डायनामिक्स आदी कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Comment

You cannot copy content of this page