कृषीक कृषी प्रदर्शनाची तयारी पूर्ण

Photo of author

By Sandhya

बारामती-एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती मार्फत आयोजित कृषीकया आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे तयारीचा आढावा आज ट्रस्टचे चेअरमन माननीय राजेंद्र दादा पवार, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रो. निलेश नलावडे, विश्वस्त मा सौ. सुनंदाताई पवार तसेच मा. रणजीत पवार यांनी घेतली. या प्रदर्शनामध्ये 170 एकर प्रक्षेत्रावरती असलेले विविध पिके पाहत असताना शेतकऱ्यांचा फ्लो कसा असावा विविध प्लॉटवरती माहिती फलक, तज्ञ व्यक्ती शेतकऱ्यांशी माहिती देण्याची व्यवस्था कशी आहे. स्टॉल मधील नियोजन, औजारे यंत्रे दालनातील नियोजन, देशभरातून येणाऱ्या शेतकऱ्यांना भोजन निवास सोय, शेतकऱ्यांना पाण्याची सोय, स्वच्छता ग्रह इत्यादी बाबत नियोजन व सूचना दिल्या,
शेतकऱ्यांची गर्दी लक्षात घेऊन यावर्षी हे प्रदर्शन दि. 17 ते 24 जानेवारी 2026 दरम्यान आठ दिवसाचे केल्यामुळे सुट्टीच्या दिवशी शेतकऱ्यांनी गर्दी करण्यापेक्षा इतर दिवशी शेतकऱ्यांनी प्राधान्य द्यावे असेही सूचित करण्यात आले
संस्थेचे विश्वस्त मा. रणजीत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भीमथडी अश्वप्रदर्शन दिनांक 17 व 18 जानेवारी रोजी करण्यात आले आहे त्याचाही आढावा घेतला. दि. 19 ते 22 जानेवारी दरम्यान डॉग शो चे आयोजन केले आहे. पशुपक्षी प्रदर्शन सर्व दिवस असणार आहे यादरम्यान एचएफ कालवडींचा ब्युटी शो असणार आहे. विश्वस्त मा. सुनंदा पवार यांचे मार्गदर्शनखाली भीमथडी जत्रेत शेतकऱ्यांची भोजन व्यवस्था, चहापान इत्यादीचाही आढावा घेतला शेतकऱ्यांची गर्दी लक्षात घेता तब्बल पन्नास एकर वरती पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे त्या बाबत सूचना दिल्या. प्रक्षेत्रावर मान्यवरांचे हस्ते उद्घाटन झाल्यानंतर आप्पासाहेब पवार सभागृह शारदानगर येथे मान्यवर शेतकऱ्यांना संबोधित करणार आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page