







रविवार पेठ बोहरी आळी येथे अटल सेवा संकल्प कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री व पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले,
यावेळी आमदार हेमंत रासने, कार्यक्रमाचे आयोजक तेजस गडाळे सचिव भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य, माजी नगरसेविका सुनंदाताई गडाळे, तुषार गडाळे, अभिनेत्री इशा केसकर, आदि यावेळी उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर, जे, अक्षय यांनी केले तर आभार अण्णासाहेब काटे यांनी मानले,
या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार आणि राज्य सरकार काम करते सर्वसामान्य नागरिकांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा ही योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कायम जपलं पाहिजे, केवळ कार्यालय चालू करणे नाही कार्यालयाच्या माध्यमातून जनतेची सेवा होणे त्यांचे अपेक्षा पूर्ण होणे या कार्यालयाच्या माध्यमातून व्हावा असा विश्वास केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या भाषणामध्ये व्यक्त केला,