
अटल सेतू ते दिघोडे फाटा या कोकणात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने त्याचा नागरिक,पर्यटक, विद्यार्थी,रुग्णांना त्रास होत आहे, रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावेत व लवकरात लवकर सदर रस्त्याचे रुंदीकरण करून काँक्रीटीकरण करावे, दिघोडे नाक्यावरील सकाळी व संध्याकाळी कंटेनर वाहतुकी साठी बंदी असलेला फलक लावण्यात यावा, तसेच या रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी या मागणीसाठी दिघोडे गावातील संतप्त नागरिकांनी शुक्रवारी ( दि २५ )चक्क दिघोडे फाट्यावरील चिखलात रुतलेल्या खड्ड्यामध्ये बसून भर पावसात भिजून आंदोलन केले.या आंदोलनात सरपंच किर्तीनिधी ठाकूर, महिला, प्रवाशी नागरीक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
आंदोलनकर्त्यांनी जवळ जवळ दिड तास चिखलातील खड्ड्यात बसून जनहितार्थ आंदोलन छेडल्याने रस्त्यावर मुंबई व कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची रांग लागली होती.आंदोलनाची दखल सार्वजनिक बांधकाम विभाग उरणचे उप अभियंता नरेश पवार,उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी दिघोडे गावचे सरपंच किर्तीनिधी ठाकूर यांना सदर रस्ता खड्डे मुक्त करण्यासाठी तसेच वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल असे लेखी पत्र दिल्याने तुर्त आंदोलन स्थगित केल्याचे सरपंच किर्तीनिधी ठाकूर यांनी सांगून सदर आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या दिघोडे गावातील ग्रामस्थ, प्रवाशी नागरिकांचे महिलांचे आभार
या आंदोलनात दिघोडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अविनाश पाटील,वर्षकेतू हासूराम ठाकूर,सरपंच किर्तीनीधी ठाकूर, उपसरपंच संदेश दयानंद पाटील, काँग्रेस पक्षाचे नेते रामनाथ पंडित, प्रेमनाथ म्हात्रे, माजी सरपंच संकीता संदिप जोशी, अँड निग्रेस पाटील, सुरेश हरिभाऊ पाटील, रमेश कोळी,अनंत नाखवा,मंदार पाटील, अलंकार ठाकूर,सुदर्शन पाटील, गोकुळदास माळी, सामाजिक कार्यकर्ते परशुराम पाटील, संदीप पाटील,रोहिदास ठाकूर,अनिल काशिनाथ पाटील,शक्ती कोळी, नरहरी कोळी,श्रावण अंबा घरत, प्रल्हाद कासकर, दयानंद काशिनाथ पाटील, अलंकार वसंत पाटील, माजी उपसरपंच आरती शक्ती कोळी, ग्रामपंचायत सदस्य अलंकार मनोहर कोळी,रेखा नरहरी कोळी, कैलास अंबाजी म्हात्रे, अभिजित वसंत पाटील, अपेक्षा आतिष पाटील, अपेक्षा राकेश कासकर,महेश म्हात्रे , नरहरी कोळी, अनिल ठाकूर, एकनाथ घरत, आत्माराम पाटील, बाळाराम ठाकूर, तसेच परिसरातील प्रवाशी नागरीक आदी सह दिघोडे ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.