जामखेड तालुक्यातील नान्नज येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Photo of author

By Sandhya

एक आरोपी फरार ; अल्पवयीन आरोपी पोलीसांचया ताब्यात

दुकानामध्ये सामान6 घेण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीला गोडाऊन मध्ये नेऊन मित्राच्या मदतीने मुलीचे हात व तोंड दाबुन तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह दोन जणांविरोधात जामखेड गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कर्जत जामखेड चे आ. रोहीत पवार यांनी या घटनेबाबत सोशल मिडिया च्या माध्यमातून तीव्र संताप व्यक्त केला असुन आरोपीला अटक न झाल्यास प्रशासनाला परवडणार नाही असे देखील म्हंटले आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की जामखेड तालुक्यातील नान्नज याठिकाणी रविवार दि 29 जुन रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलगी व तीची आई दुकानात आसताना त्या ठिकाणी आरोपी मनोज महादेव हुंबे वय 25 रा बोर्ले ता. जामखेड व त्याच्या सोबत त्याचा एक अल्पवयीन आरोपी मित्र असे दोघेजण दुकानात आले. अल्पवयीन मुलगा हा अल्पवयीन फीर्यादी मुलगी हीच्या वर्गातीलच आहे. यानंतर सामान देण्यासाठी फीर्यादी अल्पवयीन मुलगी व आरोपी हे त्यांच्या घराजवळील गोडाऊन मध्ये आले. यावेळी अल्पवयीन मुलाने फीर्यादी मुलीचे तोंड दाबले व दोन्ही हात पकडले तर आरोपी मनोज हुंबे याने पिडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला व घटनास्थळाहुन आरोपी पळुन गेले. यानंतर सदरचा घडलेला प्रकार पिडीत अल्पवयीन मुलीने आपल्या आईला सांगितला व त्यानंतर पिडीत मुलीच्या आईवडिलांनी जामखेड पोलीस स्टेशनला धाव घेतली.

याप्रकरणी पिडीत अल्पवयीन मुलीने जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून मनोज महादेव हुंबे वय 25 वर्षे व त्याचा एक अल्पवयीन मित्र दोघे रा. बोर्ले ता. जामखेड या दोघांनवर जामखेड पोलीस स्टेशनला पोक्सो व अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मधिल अल्पवयीन मुलास अहिल्यानगर येथील बालसुधारगृहात पाठवण्यात आले असुन दुसरा आरोपी मनोज हुंबे हा अद्याप फरार आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव या करीत आहेत.

आ. रोहीत पवार यांनी केला संताप व्यक्त –

याबाबत आ. रोहीत पवार यांनी फेसबुक पोष्ट करित म्हंटले आहे की माझ्या मतदारसंघात एका व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलीसोबत झालेला अत्याचाराचा प्रकार हा अत्यंत घृणास्पद आणि किळसवाणा असून या कृत्याचा मी तीव्र निषेध करतो. यासंदर्भात पोलिस अधीक्षक घार्गे साहेब यांच्याशी बोलणं झालं असून एका आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत तर दुसऱ्या आरोपीलाही तातडीने अटक करण्याबाबत पोलिस प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं. पण अटक झाली नाही तर ते प्रशासनाला परवडणार नाही. राज्यात महिला अत्याचाराच्या घटना का वाढत आहेत? गुन्हेगारांना कायद्याचा धाक नाही का? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला असून सरकारने याकडं कठोरपणे लक्ष देण्याची गरज आहे. जेणेकरुन महाराष्ट्रात एकाही भगिनीकडं वाकड्या नजरेने पाहण्याची कुणाचीही हिंमत होता कामा नये !

Leave a Comment

You cannot copy content of this page