जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि वेगवेगळ्या 4 गुन्ह्यातील सराईत फरार आरोपीस बारामती तालुका पोलिसांकडून अटक

Photo of author

By Sandhya

जुने वैर,महिलेवर रक्तरंजित हल्ला; फरार आरोपी अखेर जेरबंद

चोरी-मारामारीचे नऊ गुन्हे दाखल असलेल्या आरोपीच्या बारामती पोलिसांनी आवळल्या मुसक्या_

बारामती-जुन्या भांडणाच्या कारणावरून सोनगाव (ता.बारामती) येथे एका महिलेला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने घरात घुसून धारदार चाकूने हल्ला केल्याची गंभीर घटना दि.२२ डिसेंबर २०२५ रोजी घडली होती.या प्रकरणातील फरार आरोपीला अखेर बारामती पोलिसांनी अटक केली आहे.या घटनेत कांचन साक्षर भोसले (वय ३८ रा.सोनगाव) या गंभीर जखमी झाल्या होत्या.या प्रकरणी नियोजन संदीप भोसले (रा. सोनगाव) याच्याविरोधात दि. २४/१२/२०२५ रोजी बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्यादी आपल्या राहत्या घरी असताना आरोपीने घराचे दार फोडून जबरदस्तीने आत प्रवेश केला.त्यानंतर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने धारदार चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादीच्या उजव्या खांद्यावर गंभीर जखम होऊन त्यांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता.पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील,सहाय्यक फौजदार सुरेंद्र वाघ, पोलीस हवालदार भारत खारतोडे,तसेच पोलीस अंमलदार राजू बन्ने,मनोज पवार व जितेंद्र शिंदे यांच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे.अटक केलेल्या आरोपीस पुढील कारवाईसाठी पुण्याच्या येरवडा कारागृहात पाठविण्यात आले आहे. आरोपीवर यापूर्वी बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत सात तर वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीत दोन असे एकूण नऊ गुन्हे दाखल असून,त्यामध्ये चोरी व मारामारीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. आरोपी चार गुन्ह्यांमध्ये फरार होता.या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९, ११८(१), ११५(२), १८९(२), १९०, १९१(१)(२)(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील व पोलीस अंमलदार राजू बन्ने हे करीत आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page