



जेजुरी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत दुपारी 12 वाजे पर्यंत 21 टक्के मतदान झाले.सकाळ पासून मंदगतीने मतदान सुरू आहे.
या निवडणुकीत एक नगराध्यक्ष तर 20 नगरसेवक पदासाठी उमेदवार निवडणूक लढवीत आहेत
दुपारी दीड वाजेपर्यंत 44.55 टक्के मतदान झाले. 15800 पैकी 6000 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
दुपारी दोन नंतर येथील मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा सुरू झाल्या असून दुपारी चार नंतर मतदानाचा वेग वाढणार आहे.
जेजुरी नगरपरिषदेची निवडणूक ही नेहमीच अर्थ पूर्ण होत असून अधिक धनलाभ मिळण्यासाठी अनेक मतदार चार नंतर मतदानासाठी येत असतात.
या निवडणुकीत कोट्यवधी रुपयांचा धुराळा झाला असल्याचे बोलले जाते. अर्थपूर्ण निवडणुकांमुळे उमेदवारांची दमछाक झाली आहे.