
पेहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करत, आपल्या सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर या विशेष मोहिमेत पाकिस्तानमधील विविध दहशतवादी अड्डे उध्वस्त करून आतंकवाद्यांचा खातमा केला.
या वीर जवानांच्या शौर्याचा गौरव करत, आणि त्यांच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी आज श्री मार्तंड देवसंस्थान येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
विशेष म्हणजे मंदिरावर आलेल्या नवदांपत्यांच्या उपस्थितीत सर्व सेवेकरी व भाविक यांच्या वतीने या आनंद क्षणाचा जल्लोष भंडारा उधळून व बुंदी वाटून करण्यात आला. सर्वांनी भारत माता की जय, वंदे मातरम व येळकोट येळकोट जय मल्हार अशा घोषणा दिल्या.
यावेळी श्री मार्तंड देवसंस्थानचे विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडेकर विश्वस्त ॲड. विश्वास पानसे, पोलीस उपनिरीक्षक हनुमंतराव भोईटे साहेब, अधिकारी बाळासाहेब खोमणे, महेश शिंदे,बाल अभिनेता दर्श खेडेकर, पुजारी वर्ग, ग्रामस्थ व सर्व अधिकारी कर्मचारी वृंद आणि भाविक भक्त या वेळी उपस्थित होते.