

— उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना चाकणच्या मेळाव्यात अप्रत्यक्ष टोला
उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत म्हटले की, “जेव्हा फिरायचे तेव्हा फिरले नाही, आता बांधावर फिरता, आमचा निर्णय झालेला आहे.”आम्ही जे बोललो ते कधी विसरत नाही . शिवसेना ही केवळ पक्ष नसून जनतेचा विश्वास आहे. विकासाच्या माध्यमातून जनतेचा प्रश्न सोडवणे हेच आमचे ध्येय आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
खेड तालुक्यातील चाकण येथे झालेल्या कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या प्रवेश मेळाव्यात उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर विधानपरिषदेचे उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे,माजी मंत्री विजय शिवतारे,खासदार श्रीरंग बारणे,आमदार शरद सोनवणे, उपनेते इरफान सय्यद,महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे सदस्य नितीन गोरे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय शिंदे,जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर,उपजिल्हा प्रमुख प्रकाश वाडेकर,अतुल देशमुख, आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.