
दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावातील सोमनाथ किसन वेताळ याने रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मागणीसाठी प्रकरण दाखल करताना वैयक्तिक सातबारा गट नंबर 420 दाखल केला होता, परंतु घरकुल बांधकाम करताना गायरानातील जागेवर बांधकाम करण्यास सुरुवात केली, फाउंडेशन लेवलला काम असताना एकूण तीन हप्ते एक लाख रुपये अदा करण्यात आले होते, याबाबत मुकुंद वेताळ यांनी दौंड पंचायत समिती ग्रामपंचायत यांच्याकडे लेखी तक्रार केली होती, याबाबत गट विकास अधिकारी महेश डोके यांनी संबंधित ग्रामपंचायतला लाभार्थ्यावर गुन्हा दाखल करण्याचे कळविले होते परंतु लाभार्थ्याला पाठबळ देण्याचे काम ग्रामपंचायत अधिकारी यांनी केले, वेळोवेळी गट विकास अधिकारी यांनी आदेश देऊनही आदेशाला केराची टोपली दाखवण्याचे काम ग्रामपंचायत अधिकारी यांनी केले, आणि संबंधित बांधकाम हे पूर्ण करण्याचे काम चालू आहे, संबंधित लाभार्थ्यावर कारवाई होत नसल्याने तक्रारदार मुकुंद वेताळ यांनी दौंड तहसील कार्यालयासमोर दिनांक 16 जून 2025 पासून अमरण उपोषण चालू केले आहे, याबाबत उपोषण करते मुकुंद वेताळ त्यांनी असे म्हटले आहे की, ग्रामपंचायत अधिकारी स्वाती लोंढे, घरकुल विभागातील अधिकारी तसेच लाभार्थी सोमनाथ वेताळ यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असे ठामपणे वेताळ यांनी सांगितले,
दौंड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी महेश डोके यांनी दिनांक 22 मे 2025 रोजी ग्रामपंचायत स्वामी चिंचोली यांना संबंधित लाभार्थ्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते परंतु, दिनांक 12 जून 2025 रोजी सुधारित पत्रानुसार विसर अधिकारी पंचायत समिती दौंड व ग्रामपंचायत अधिकारी स्वामी चिंचोली यांनी समक्ष पाहणी करून अहवाल दोन दिवसात कार्यालयात सादर करण्याचे आदेश दिले होते, तरी काही दिवसापूर्वी दौंड पंचायत समिती यांना कळवण्यात आले होते की, घरकुल लाभार्थ्याला हप्ता सोडताना ग्रामपंचायत तसेच ग्रामपंचायत अधिकारी यांना विचारल्याशिवाय सोडण्यात येऊ नये
असे स्वाती लोंढे, ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत स्वामी चिंचोली दौंड