नगरपरिषदेच्या जिथे सार्वत्रिक निवडणूक आहेत, तिथे २० डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Photo of author

By Sandhya

जिल्ह्यातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीकरिता शनिवार, २० डिसेंबर २०२५ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.

सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील बारामती, दौंड, फुरसुंगी-उरुळी देवाची, लोणावळा आणि तळेगाव दाभाडे या नगरपरिषदेच्या मतदार संघात सुट्टी असणार आहे. सर्व विभागानी त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे/मंडळे आदींच्या निदर्शनास आणून द्यावी. मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामाकरिता त्या त्या मतदारसंघाच्या बाहेर असणाऱ्यांना मतदारांना देखील लागू राहणार आहे. केंद्र शासनाच्या शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींना सार्वजनिक सुट्टी लागू राहील, येत्या २० डिसेंबर २०२५ रोजी मतदारांनी नचुकता मतदान करावे, असे आवाहन श्री. डुडी यांनी केले आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page