नानगांव शिकारी बान्यात बिबट्या घायाळ

Photo of author

By Sandhya

नानगाव,ता.दौंड येथे गावाजवळील अमोनीमाळ शिवारात शेतकरी सोनबा ढमे यांच्या गट नंबर ८३ मध्ये रान शिकार पकडण्यासाठी लावलेल्या फाशात दि.८ रोजी बिबट्या अडकल्याची खळबळजनक घटना घडली. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती, तर रस्त्यावर वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली होती.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते, त्यांनी बिबट्याला सुरक्षितपणे पकडण्यासाठी पिंजरा आणि ट्रानकलिझर गन वापरण्याची तयारी सुरू केली, अन बिबटयाला बेशुद्ध करण्यासाठी डाट मारून अखेर त्याची त्या शिकारी फाशातून सुटका केली. लोखंडी फासा असल्याने बिबट्याच्या पायाच्या डाव्या पंजास ईजा झाली असून, त्यास पुढील उपचारासाठी वन्य प्राणी उपचार केंद्र बावधन पुणे येथे पाठविण्यात आले आहे.रेस्क्यू टीम ने उत्कृष्ट कामगिरी करीत त्यातून त्याची सुटका केली, अशी माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी दिली

यावेळी पोलीस पाटील पोपट लव्हे, शोभा खळदकर, वनपरीक्षेत्र अधिकारी राहुल काळे, वनपाल योगिता वीर, अंकुश खरात, वनरक्षक गणेश मस्के, शिवकुमार बोबले, सोनाली राठोड,नाना चव्हाण,अक्षय शितोळे, निखिल इंगळे, वनमजूर भरत शितोळे, बाबा कोकरे,अरुण मदने, पुण्यातील रेस्क्यू टीमचे नचिकेत अवधानी व सहकारी आदी उपस्थित होते.

Leave a Comment

You cannot copy content of this page