पाईटजवळ अपघातातील मृतांचा सामुदायिक अंत्यसंस्कार

Photo of author

By Sandhya

राजगुरुनगर (संध्या) पाईट (ता. खेड) येथील श्री क्षेत्र कुंडेश्वर मंदिराजवळ झालेल्या भीषण अपघातातील मृतांची रात्री उशिरा पापळवाडी येथे हृदयद्रावक वातावरणात सामुदायिक अंत्यसंस्कार करण्यात आले.
सोमवारी श्रावणी सोमवार निमित्त दर्शनासाठी निघालेल्या पापळवाडी येथील महिला भाविकांची गाडी दरीत कोसळून दहा जणांचा मृत्यू झाला होता.या दुर्देवी घटनेच्या वृत्ताने खेड तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होते.
काल दिनांक ११रोजी तिसरा सोमवार असल्याने पापळवाडी(पाईट)येथील महिला कुंडेश्वर येथील मंदिरात माल वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनातून भक्तिमय वातावरणात भजन गात दर्शनासाठी निघाल्या होत्या.
कुंडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी मुख्य घाट सुरू होण्यापूर्वी गाडीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याने गाडी चढ चढू शकली नाही. व वाहकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी मागे आली.आणि सत्तर ते ऐंशी फूट दरीत पलटी खात दरीत कोसळली.गाडीमध्ये एकूण ३७महिला तीन मुले व चालक असे ४१ भाविक एकमेकावर आदळले गेले.जखमी व मृत महिला पापळवाडी गावच्या असून दर्शनासाठी जाताना या सर्व महिला पांढऱ्या रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या. मनोभावे दर्शनासाठी गेलेल्या महिलांवर काळाने घाला घातल्याने पापळवाडी सह पाईट
गावात शोककळा पसरली असून,तालुक्यात देखील या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.रात्री उशिरा अंत्यसंस्कारावेळी हंबरडा फोडणाऱ्या नातेवाईकांच्या आक्रोशाने वातावरण दाटून आले होते.
यावेळी आमदार बाबाजी काळे , उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष कार्य अधिकारी दिगंबर रौंधळ, उपमुख्यमंत्र्यांचे मेडिकल सेलचे प्रमुख मधुसूदन मगर,जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कैलास सांडभोर,माजी उपसभापती चांगदेव शिवेकर पश्चिम महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष साहेबराव राळे पाटील प्रांत अधिकारी अनिल दोंदे नाय तहसीलदार रामबिजे पोलीस उपनिरीक्षक दत्ता जाधव, मंडळ अधिकारी मनीषा सुतार, .या दुःखद प्रसंगी परिसरातील नागरिक, सामाजिक संघटना, व विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते


अपघात प्रचंड भीषण असल्याने अपघातग्रस्त रुग्णांना तातडीने पुढील उपचारासाठी राजगुरुनगर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालय (चांडोली) तसेच साळुंखे हॉस्पिटल गावडे हॉस्पिटल पोखरकर हॉस्पिटल सुश्रुत हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. रात्री अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या महिलांवर रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया चालू होती त्याचप्रमाणे पोलिसांकरवी गुन्हा दाखल करण्याची ही प्रक्रिया सुरू असल्याने अंतिम संस्कार करण्यास रात्री बारा वाजले. अंतिम संस्कार करण्यास मध्य रात्र झाली असताना सुद्धा मोठ्या प्रमाणावर जनसागर लोटला होता. एकच ठिकाणी एकच वेळी 10 महिलांवर अंतिम संस्कार करण्याची वेळ पापळवाडी पाईट येथील ग्रामस्थांवर आली अत्यंत रुदय पिळवटून टाकणारी घटना घडली

Leave a Comment

You cannot copy content of this page