

बावधन पुणे येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील ईस्टिट्युट औफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयात राज्यस्तरीय हैकेथान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत संपूर्ण राज्यातून १२५ पेक्षा जास्त संघानी भाग घेतला होता.ही स्पर्धा PVPIT बावधन दरवर्षी मोठ्या कुशलतेने हाताळत असतं
या स्पर्धे मध्ये विद्यार्थांनी नवनवीन कौशल्य असणारी अत्याधुनिक संकल्पना मांडली.ह्या संकल्पना मांडताना artificial intelligence च्या धरती वरील संकल्पना विशेष लक्ष वेधत होत्या.
या स्पर्धेमुळे ग्रामीण व शहरी भागातील वेगवेगळ्या विषयांवर आधारित शेतीमध्ये एआय चा वापर, मल्टी टास्किंग रोबोट, ट्रॅफिक मैनेजमेंट, इ व्हेईकल , अत्याधुनिक ड्रोन मेकींग आटोमेशन, औषध निर्माण इत्यादी उपक्रमाचे प्रेझेंटेशन विद्यार्थ्यांनी सादर केले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून टीसीएस चे मा.ऋषिकेश धांडे उपस्थित होते.तर ब्लीस सोलुशन प्रा लि चे सीईओ मा.मुकुंद दायमा,गौरव दायमा हे
विशेष पाहुणे म्हणून लाभले.
संस्थेचे अध्यक्ष मा प्रा डॉ तानाजीराव सावंत, सचिव मा गिरीराज सावंत, संकुल संचालक डॉ वसंत बुगडे यांचें विषेश मार्गदर्शन लाभले.
या प्रसंगी संस्थेचे प्राचार्य डॉ. आर.एस.पवार यांनी प्रास्ताविक केले . .याप्रसंगी प्रमुख पाहुणे मा.ऋषिकेष धांडे यांनी, सध्या AI किंवा AI आधारित प्रणाली मानवी युगात किती बदल घडवून आणणार हे सांगितले.ही प्रणाली वैद्यकीय क्षेत्रापासून ते वेगवेगळ्या जीवन प्रणाली मधे कशी उपयुक्त आहे हे अत्यंत चपलख प्रमाणे सांगितले .
ह्या स्पर्धेचे पर्यवेक्षक म्हणून मा. प्रमोद गवळी, मा.मुकुंद दायमा, डॉ.पोतदार, ह्यांनी कार्य पाहिले.
हे पर्यवेक्षक वेगवेगळ्या इंटरनॅशनल कंपनी मध्ये कार्यरत आहेत.
डायरेक्टर मा.डॉ.नवनाथ बागल ,डॉ.राहुल कराळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ही स्पर्धा PVPIT संकुलाची रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल च्या माध्यमातून SAE INDIA च्या मदतीने आयोजित करण्यात आली.
ही स्पर्धा डॉ.आर. रश्मी, डॉ राजु कांबळे यांच्या नेतृत्वात व डॉ.कीर्ती गुराणी, प्रा. सुवर्णा बहिर, प्रा सन्मुख सुंदरम, प्रा एम के तिवारी, प्रा हितेश चौधरी, प्रा एस ए शिंपले, प्रा तुषार बोरा, प्रा थोटे प्रा ऊंडेगावकर,सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांच्या अथक प्रयत्नांनी पार पडली.
या सर्धेतील प्रत्येक ग्रुप मधील त्यांच्या कल्पना एवढ्या भन्नाट होत्या की सर्वच ग्रुप तोडीस तोड होते.म्हणून आयोजकांनी प्रथम,द्वितीय, व तृतीय क्रमांकाचे बक्षीस विभागून देण्याचा निर्णय घेतला तसेच चार उत्तेजनार्थ बक्षिसे सुद्धा जाहीर करण्यात आले.
विजेते विद्यार्थी व उपक्रम
१. Maximize Station Throughput for Computer Networking
- सामर्थ लाड, अनुष्का बेन्डले, आर्या गोडबोले, निश्चय जाधव, सोहन चव्हाण, प्रीती बडवे
२.Water Quality Assessment By Using IoT
- प्रथमेश दराडे, प्रथमेश बारगळ, पवन कोळी, यशदीप मर्ने, रणजित वाघमोडे
३.Augmented Reality (Heritage Platform)
- मयंक महाजन, माहेक वर्मा, जान्वी नरखेडे, गौरी पाटील, रोहित माने, सुशांत कदम