

शहरी ,ग्रामीण भागातील बचत गटांच्या महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने पायल तिवारी बिटिया फांऊडेशनचा गौरी – गणपती जत्रा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात गणेशोत्सवानिमित्ता तीन दिवसीय गौरी – गणपती जत्रेचे उध्दाटन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोहोळ यांनीही बचत गटांच्या महिलांच्या विविध उत्पादनाची पाहणी केली.गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांना घरगुती ,पर्यावरणपुरक वस्तु चांगल्या दर्जाच्या मिळत असुन अशा उपक्रमांच्या माध्यमातुन महिला बचत गटांची उत्पादने नागरिकांसमोर येत असतात. यातुन चांगली आर्थिक उलाढालही होत असते .अस मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी सांगितले . दरम्यान या प्रदर्शनाला पुणे महापालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांनी भेट दिली. पुणे महापालिकेच्या माध्यमातुन अशा उपक्रमाची व्याप्ती वाढविण्याकरता पायल तिवारी फाऊंडेशन ला मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. केंद्र सरकारच्या माध्यमातुन देशात एक कोटी महिला या बचतगटांच्या माध्यमातुन काम करतात अशा महिलांना चांगले व्यासपीठ देण्याचे काम केंद्र सरकार करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. हे प्रदर्शन पंचवीस आँगस्टपर्यत सुरु राहणार आहे. या प्रदर्शनामध्ये वाती ते मुर्ती,सौंदर्य प्रसाधने, धुप ,अगरबत्ती,कापडी पर्यावरणपुरक वस्तुही या ठिकाणी पाहायला मिळतात.