भिगवणला कर्जतच्या निबंधकाचा सत्कार, कार्यरत नसताना झालेला सन्मान कामाची पावती : मिलिंद राऊत

Photo of author

By Sandhya

सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक मिलिंद राऊत यांचा भिगवणजवळील तक्रारवाडी ( ता.इंदापुर) येथे डिकसळ व तक्रारवाडी विविध कार्यकारी संस्थेच्या वतीने संचालक मंडळाने ग्रामपंचायत कार्यालयल तक्रारवाडी येथे सन्मान केला. मिलिंद राऊत यांची नुकतीच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात सहाय्यक निबंधक म्हणून बढती झाली आहे राऊत हे चार वर्षे इंदापूर तालुक्यात सहकार अधिकारी श्रेणी 1 म्हणून कार्यरत होते,दरम्यानच्या काळात प्रभारी सहाय्यक निबंधक म्हणून त्यांनी काही काळ कार्यभार सांभाळला होता मध्यंतरी त्यांची राजगुरू येथे बदली झाली होती. राऊत हे इंदापूर तालुक्यात कार्यरत असताना त्यांनी अतिशय प्रभावीपणे आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता अनेक शेतकरी व संस्थाचालक यांच्यामध्ये समन्वय साधण्याची महत्वपूर्ण जबाबदारी त्यांनी पार पडली होती इंदापूर तालुक्यातील अनेक गावातील सहकारी संस्थेचे चेअरमन,पंचकमिटी सदस्य व सभासद शेतकऱ्यांशी त्यांचे निकटचे संबंध निर्माण झाले होते. शुक्रवार तारीख ( ता.७)रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुका येथे रुजू होण्यासाठी रवाना होत असताना त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी तक्रारवाडी सोसायटीचे चेअरमन यशवंत वाघ, मा.चेअरमन रामभाऊ जाधव,योगेश्वरी डिकसळ सोसायटीचे मा. चेअरमन जिजाराम पोंदकुले, मा.व्हा. चेअरमन व विद्यमान संचालक विजयकुमार गायकवाड मा. व्हा.चेअरमन सोमनाथ भादेकर,मा . संचालक चंद्रकांत हगारे,तक्रारवाडी ग्रामपंचायत सदस्य शरद वाघ, लेखा परीक्षक दत्तात्रय जांभळे, सोसायटी सचिव सिकंदर आत्तार व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना मिलिंद राऊत यांनी सांगितले की पदावर असताना कोणीही माझा सन्मान करीत होते पण पदावर नसताना झालेला सन्मान ही कामाची पावती असते मी इंदापूर तालुक्यात कार्यरत नसतानाही माझा सन्मान झाला यापेक्षा कुठलाही आनंद माझ्या जीवनात महत्त्वाचा नाही.

Leave a Comment

You cannot copy content of this page