












मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा, धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या समन्वयाने श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान 2025 मंचर शहरातील चौंडेश्वरी माता मंदिर या ठिकाणी दि.3/9/2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वा पर्यत राबवण्यात आला.
या शिबिराला माता-भगिनींचा, वडीलधाऱ्या बांधवांचा व मंचरकरांचा मोठा प्रतिसाद मिळाला एकूण 682 नागरिकांची तपासणी मोफत करण्यात आली.तसेच 252 नागरिकांना मोफत चष्मा वाटप करण्यात आला व 172 नागरिकांची रक्त तपासणी मोफत करण्यात आली तसेच हृदयरोग उपचार,किडनी संबंधित उपचार,कॅन्सर उपचार,प्रमुख अवयव प्रत्यारोपण, न्यूरोलॉजिकल विकार,गंभीर अपघात जखम,उपचार दुर्मिळ आजार तसेच प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य एकत्रित योजनेअंतर्गत येणारे व्याधी विकार व आजार असे इतर आजारावर उपचार पुढील काळामध्ये मोफत करण्यात येणार आहे सर्व नागरिकांचे व गणेश मंडळांचे भाजप नेते जनसेवक श्री संजय जिजाबा थोरात यांनी आभार मानले.
यावेळी भाजपा नेते जनसेवक श्री संजय थोरात,डॉ साबळे सर, डॉ हर्षल साळी,डॉ.प्रतीक गायकवाड,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.तुषार पवार, प्राथमिक आरोग्य केंद्र अवसरी खुर्द चे वैद्यकीय अधिकारी डॉ.याज्ञीक रणखांब,तालुकाध्यक्ष स्नेहल चासकर,प्रमिला ताई निराळे,सुजाता हुले,पूजा भोर, स्वाती शेळके,रवींद्र त्रिवेदी,कैलास राजगुरू,नवनाथ थोरात,कालिदास गांजाळे,सुदर्शन चपटे,सुनिल कहडने,सुरेश अभंग,सुनित थोरात,विजय शिंदे,प्रशांत कडदेकर,प्रदीप श्रीश्रीमल,गणेश राऊत,शिवप्रसाद राजगुरू,विनायक सोमवंशी,रोहन जंगले,राजू सोमवंशी,संजय भंडारी,अतीश काजळे,गणेश काजळे,राकेश काजळे,हर्षल श्रीश्रीमल,अक्षय शर्मा,तुषार क्षीरसागर,रुपेश पुंगलिया,निमेश पुंगलिया, प्रमोद कडदेकर,तुकाराम पंदारे,दिलीप शर्मा,भरत काळे,सुभाष मावकर, प्रवीण फुटाणे,डॉ.रेश्मा बचुटे मॅडम,आरोग्य निरीक्षक श्री सिद्धेश्वर गुंजकर,श्रीमती एस डी. हजारे आरोग्य सेविका श्री दत्तात्रय सोनवणे आरोग्य सेवक, दत्तात्रय विरनक,आरोग्य सेवक गटप्रवर्तक श्रीमती गीताल गावडे व सर्व आशा वर्कर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला विशेष सहकार्य मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, आंबेगाव तालुका आरोग्य विभाग,मंचर शहरातील गणेश मंडळ,गेटवेल हॉस्पिटल मंचर, मनोहर डोळे हॉस्पिटल नारायणगाव व पत्रकार बांधवांनी केले.