वन विभागाच्या पंचनाम्यानंतर काही तासांत पुन्हा घातक रसायन सोडले

Photo of author

By Sandhya

स्थानिक शेकतरी संतापले ; पोलीस व वन विभागाच्या कारवाईवर स्थानिक नाराज

नीरा :
बुधवारी गुळूंचे कर्नलवाडी गावच्या माळरानावर व वन विभागाच्या जागेत घातक रसायन सोडताना टँकर चालकासह एकाला स्थानिकांनी रंगेहात पकडून पोलीस जेजुरी पोलिसांकडे दिले होते. त्यानंतर गुरुवारी संध्याकाळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन पंचनामा केला होता. पंचनामा केल्याच्या काही तासानंतरच पुन्हा तशाच प्रकारचे घातक रसायन वन विभागाच्या व स्थानिक ग्रामस्थांच्या मोकळ्या माळरानावर सोडल्याने आश्चर्य व्यक्त करत संताप व्यक्त केला.

  नीरा मोरगाव मार्गावरील पुरंदर तालुक्यातील  गुळूंचे कर्नलवाडी परिसरात दोन दिवसांपूर्वी घातक रसायन वाहतूक करणाऱ्या टँकर मधून रसायन माळरानावर व वन विभागाच्या जमिनीत सोडले जात होते. या टँकर सोबत असलेला चालक व एक ठेकेदाराला कर्नलवाडीच्या ब्राह्मणदरा वस्तीतील युवकांनी रंगेहात पकडून त्याला नीरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. यानंतर नीरा पोलिसांनी तो टँकर जेजुरी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिला. 

   गुरुवारी दिवसभरात जेजुरी पोलिसांकडून टँकर मालकासह चालका व ठेकेदारावर कोणतीही कारवाई झाली नाही. संध्याकाळी उशिरा पुरंदरच्या वनविभागाचे अधिकारी जेजुरी पोलीस स्टेशनला येऊन पुढील कारवाई करण्याचे सांगितले. त्या दृष्टीने पुरंदरच्या वन अधिकाऱ्यांनी गुळूंचे कर्नरलवाडीच्या माळरानावर संध्याकाळी भेट देत, घातक रसायन टाकलेल्या ठिकाणी पंचनामा केला. यानंतर काही वेळातच पुन्हा तशाच पद्धतीने घातक रसायन त्याच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर टाकण्यात आल्याचे शुक्रवारी पहाटे आढळून आले. आता मात्र या परिसरावर मध्ये प्रचंड दुर्गंधी पसरली असून आज शुक्रवारी दिवसभर झालेल्या पावसामुळे हे रसायन लोकवस्तीकडे वाहत आहे. तसेच, वन विभागात वन विभागाच्या हद्दीत टाकल्यामुळे तेही पानवट्याच्या दिशेने पसरत आहे. 

  इतकी मोठी गंभीर प्रदूषणाची बाब असूनही यामध्ये पोलीस व वन विभाग बोटचेपी भूमिका घेत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी गुरुवारी संध्याकाळपासून माहिती मागितली असता ते याबाबतची माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास येत आहे. 

  जेजुरी पोलिसांनी या टँकर चालक व टँकर मालकावर कोणतीही कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बुधवारी रात्री घडलेल्या घटनेची जेजुरी पोलिसांना २५ ग्रामस्थांच्या सही असलेले तक्रारी अर्ज दिला होता. मात्र, त्या अर्जाला पोलिसांनी केराची टोपली दाखवत कोणतीही कारवाई केली नसल्याने यामध्ये काहीतरी मोठं गौडबंगाला असल्याची स्थानिक नागरिकांनी सांगितले.

Leave a Comment

You cannot copy content of this page