

पुणे – सोलापूर महामार्गावर दुपारी एक वाजता कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील मधुबन कार्यालय समोर ट्रॅक्टर मधून ऑइल गलती होऊन अनेक दुचाकी स्वार घसरल्याची माहिती वाहतूक पोलीस अनिल गायकवाड यांना मिळाली .
त्यांनी ताबडतोब सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सुकाळे यांच्या मदतीने सांडलेल्या ऑइलवर माती टाकणे चालू केले. ट्रॅक्टर मधून ऑइल गळती झाल्याची माहिती नागरिकांनी ट्रॅक्टर चालकाला देऊन सुद्धा ट्रॅक्टर थांबला नाही . त्यामुळे ऑइल गळतीचा पट्टा लांब पर्यंत झाला .यामुळे अनेक दुचाकीस्वार त्यावरून घसरले तसेच एक महिला पोलीस अधिकारी सुद्धा या ऑइल गळती झालेल्या ऑइलवरून घसरल्या. या आँईल गलतीमुळे थोडीशी वाहतूक कोंडी झाली .वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार अनिल गायकवाड यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून सुकाळे यांच्या मदतीने ऑइल वरती माती टाकली त्यामुळे मोठी दुर्घटना टळली .