
दिनांक 3 पुरंदर तालुक्यातील मावडी क प. येथे दाजींरच्या शेतात बाजरीच्या पिकात ज्ञानदेव लक्ष्मण भामे वय 82 हे मयत स्वरूपात आढळून आले होते. या प्रकाराबाबत जेजुरी पोलिसांनी कसून तपास करून शोध घेतला असता सख्या भावनेच भावाचा शेतातील रस्त्यावरून वाद होवून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.
या बाबत जेजुरी पोलिसांनी दिली माहिती अशी की संबंधित पुरंदर तालुक्यातील मावडी क प येथील ज्ञानदेव लक्ष्मण भामे यांचा सख्खा लहान भाऊ चांगदेव लक्ष्मण भावे या दोघांमध्ये जमिनीतील रस्त्यावरून वाद होता . दिनांक 31 रोजी ज्ञानदेव भामे हे मावडी जवळील दाजिरच्या शेतात गेले होते. दिनांक 1 रोजी या शेतात त्यांचे प्रेत आढळून आले. शवविच्छेदन अहवालात सदर इसमाच्या डोक्यात खोल जखम होवून रक्तस्त्राव साठून मृत्यु झाल्याचे निष्पन्न झाल्याने या इसमाचा खून झाला असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने सुरू केली.
जेजुरी पोलिसांनी मयत ज्ञानदेव भामे यांचा लहान भाऊ चांगदेव भामे यास ताब्यात घेऊन चौकशी केली. परंतु सुरुवातीला त्याने याबाबत बोलण्यास नकार दिला मात्र त्याला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने या खुनाचा कबुली जवाब दिला .
त्याने त्याच्या सख्खा भाऊ ज्ञानदेव लक्ष्मण भामे हे जमिनीतील रस्ता अडवत असल्याकारणाने रस्ता देत नसल्याने त्याला हाताने, लाथा बुक्क्याने व लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत डोक्यात गंभीर जखम झाली. यात त्यांचा मृत्यू झाला.
ज्ञानदेव लक्ष्मण भामे यांचा खून त्याचा सख्खा भाऊ चांगदेव भामे यांनीच केलेले उघडकीस आले. दि 2 ऑगस्ट रोजी त्याला जेजुरी पोलिसांनी अटक करून चोवीस तासाच्या आत या खुनाच्या घटनेला वाचा फोडली.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार बारामती विभाग उपविभागीय अधिकारी तानाजी बरडेयांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी,महेश पाटील, नामदेव तारडे,पोलीस हवालदार दशरथ बनसोडे, विठ्ठल कदम , मुनीर मुजावर , संदीप भापकर पोलीस कॉन्स्टेबल हेमंत भोंगळे यांच्या पथकाने या खुनाचा गुन्हा उघडकीस आणला असून सदर गुन्ह्चायाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील करीत आहेत.