
मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट च्या वतीने आयोजन ; वासंतिक चंदन उटी
पुणे : रंगीबेरंगी फुलांची आकर्षक आरास… चंदन उटीचे लेपन आणि तब्बल १ हजार ५०० कलिंगडांचा नैवेद्य श्री तुळशीबाग महागणपतीला दाखविण्यात आला. शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात (१२५) संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पासमोर साकारलेला कलिंगडांचा नैवेद्य व पुष आरास पाहण्याकरिता गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली.
मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट च्या वतीने कलिंगडाचा महानैवेद्य व वासंतीक चंदन उटीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, उपाध्यक्ष विनायक कदम, दत्ताभाऊ कावरे, गणेश रामलिंग आणि परिसरातील व्यापारी उपस्थित होते. प्रसिद्ध पुष्प सजावटकार सुभाष सरपाले यांनी ही आरास साकारली.
संकष्टी चतुर्थी च्या दिवशी वासंतिक चंदन उटी लेपन करण्यात आले. तसेच रात्री गणेश जागर आणि महाआरती चे आयोजन करण्यात आले होते. शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मंडळातर्फे विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
–
–